आभा काळबांडे हिला व्हायचं आहे डॉक्टर

दहावीत 97.60 टक्के गुण

अमरावती / 14 मे : अमरावतीच्या होलीक्रॉस कॉन्व्हेंट इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थीनी आभा श्रीकांत काळबांडे हिने दहावीची परिक्षा 97.60 टक्के गुणांसह उत्तीर्ण करुन घवघवीत यश प्राप्त केले आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा थॉमस, वर्ग शिक्षिका वंदना रफेल व शिक्षिकांना तसेच साई कोचिंग क्लासेसचे संचालक व शिक्षक हटवार, पाटील यांना दिले आहे.
आपल्या यशात सेवानिवृत्त शिक्षक असलेल्या आपल्या आजी व आजोबां मोठा वाटा असल्याचेही तिने म्हटले आहे. आभाचे वडील श्रीकांत काळबांडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात शिक्षक असून आई दर्यापूर नगर परिषद शाळेत शिक्षका आहे. तिचा लहान भाऊ इयत्ता पाचविचा विद्यार्थी आहे. आभा हीला कलेची आवड असून तिने भविष्यात डॉक्टर होवून समाजसेवा करण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. ती पुढे स्पर्धा परीक्षेच्या तयारीवरही लक्ष केंद्रित करणार आहे. आभा हीने होलीक्रॉस कॉन्व्हेंट इंग्लिश हायस्कूलचे आभार मानले आहेत. शाळेत सर्व सोयी सुविधा असून अत्यंत चांगल्या पद्धतीचे शिक्षण दिल्या जात असल्याचे म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button