आ.रवी राणा घेणारं अमरावती शहरातील
नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्या पूर्वीची उपायोजना आढावा बैठक

मनपा आयुक्त व मनपा चे सर्व विभागाचे अधिकारी राहणार उपस्थित
अमरावती /29 मे: आ.रवी राणा यांचे प्रमुख उपस्थितीत आयुक्त मनपा व मनपाचे सर्व यंत्रणा प्रमुख यांचे उपस्थितीत उद्या दिनांक 30 _5 _2025 रोजी दुपारी 12:00 वा. मनपाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह या सभागृहात आ.रवी राणा हे शहरातील नागरिकांना होत असणार्या त्रास व त्यांचे सुरक्षेतेसाठी अधिकार्यांकडून ठोस उपययोजना आखण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी आढावा बैठक घेणार आहे.
आ.रवी राणा हे शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिकार्यांना धारेवर धरणार असून एकंदरीत बैठक वादळी होण्याचे संकेत आहे. पावसाळा सुरू झाला असून पावसाळ्या पूर्वीची उपायोजना ची कामे जसे की नाला खोलीकरण, रस्ते दुरुस्ती, गटाराची, नाली ची कामे व नालानाला दुरुस्ती ,आदी महत्त्वाचे कामाबाबत आमदार रवी राणा अधिकार्यांना उत्तरे घेणारं आहेत. अमरावती मनपा ची नवीन बिल्डिंग बांधकाम करणे बाबत शासनाचे पत्र प्राप्त होऊन शासनाने मनपा कडून अहवाल मागितला आहे. आयुक्त तथा प्रशासक यांना यापूर्वीच बैठकीचे पत्र आ.राणा यांचे स्वीय सचिव उमेश ढोणे यांनी दिले आहे ज्या पत्रात मनपाचे एकूण शहरातील 23 ज्वलंत विषय आहेः विषयावर मनपाची ही आढावा बैठक वादळी ठरणार आहे. भाजपाचे व युवा स्वाभिमान पार्टी चे प्रमुख पदाधिकारी यांनाही या बैठकीत निमंत्रित केले असून तेसुद्धा शहरातील विकासाचे मुद्दे सध्या आमदार रवि राणा यांच्या समोर ठेवून अधिकार्यांकडून ठोस उपाय योजना बाबत रवी राणा हे बैठकीत उपस्थित अधिकार्यांनी निर्देश देतील देतील.