आशा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे 20 हजार नेत्र तपासणी

7000 रुग्णांची शस्त्रक्रिया यशस्वी

मोर्शी /25 मे: आशा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आतापर्यंत जवळपास 20 हजार रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात येऊन 7000 रुग्णांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून वयोवृद्धांना सुद्धा दृष्टी मिळावी व त्यांना सुद्धा जग पाहण्याची संधी प्राप्त व्हावी हा सामाजिक उद्देश समोर ठेवून आशा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कित्येक वर्षापासून हा उपक्रम राबविल्या जात असल्याचे मत मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा आशा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष चंदूभाऊ उर्फ उमेश यावलकर यांनी भारतीय जनता पार्टी,महात्मा आय बँक अँड आय हॉस्पिटल नागपूर तथा आशा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेत्र तपासणी शिबिराप्रसंगी व्यक्त केले.या शिबिराचे आयोजन दि.25 मे रोजी राममंदिर येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार चंदूभाऊ यावलकर यांनी भूषविले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राऊत, भाजपाचे शहराध्यक्ष राहुल चौधरी,नितीन उमाळे,ज्योतीप्रसाद मालवीय,श्रीकांत मांडवे,दीपक नेवारे, सुनीता कोहळे,अनिता लांजेवार,पत्रकार अजय पाटील,संजय गारपवार उपस्थित होते.सर्वप्रथम गावकर्‍यांच्या व रुग्णांच्या वतीने आमदार महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या भव्य नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात एकूण 1320 महिला पुरुषांची तपासणी करण्यात आली.यावेळी 630 रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.जवळपास 212 रुग्ण नेत्र शास्त्रक्रियेसाठी पात्र ठरले असून त्यापैकी 50 ते 55 रुग्णांना दि. 26 मे रोजी महात्मे हॉस्पिटल नागपूर येथे नेण्यात येऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे.उर्वरित रुग्णांना सुद्धा लवकरच शस्त्रक्रियेसाठी रवाना करणार असल्याचे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राऊत यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण राऊत यांनी संचालन व आभार प्रदर्शन भाजपाचे शहराध्यक्ष राहुल चौधरी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपाचे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून अथक परिश्रम घेतले.या शिबिराला गावातील महिला पुरुषांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला.

संबंधित बातम्या

Back to top button