विदर्भाचा बॅकलॉग 2027 पर्यंत संपणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

*अकोल्यात 2 हजार 588 कोटी निधीतून विकासकामे 

*विविध 21 कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

अकोला /11 जून-आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रित लढवणार आहे. या संदर्भातील निर्णय भाजपचे प्रदेशाध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष आणि निवडणूक समिती घेईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. एखाद्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतही होऊ शकते, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. ते अकोल्यात माध्यमांशी बोलत होते. अकोल्यातील भूमिगत गटार योजनेसाठी लागणारा महापालिकेचा 30 टक्के भाग राज्य सरकार देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच जनतेने आम्हाला खुर्च्या तोडण्यासाठी सत्ता दिलेली नाही, तर विकासासाठी दिलेला आहे. आमचा भविष्यात ऑनलाईन कामावर भर राहणार आहे. वर्षाच्या अखेर पर्यंत आम्हाला सर्व ऑनलाईन करायचं आहे. तसंच विदर्भाचा बॅकलॉग 2027 पर्यंत संपणार, असंही फडणवीस यांनी सांगितलं. अकोला जिल्ह्यात सुमारे अडीच हजार कोटींहून अधिक म्हणजेच 2 हजार 588 कोटी 55 लाख रूपयांच्या निधीच्या विविध 21 विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. सिंचन, रस्ते, रूग्णालय सुधारणा, सांस्कृतिक भवन, तरण तलावासह विविध प्रशासकीय इमारती अशा विकास कामांमुळे जिल्ह्यातील विकासाचा प्रवाह गतिमान होणार आहे. विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रवीींद्र चव्हाण, आमदार हरिष पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदारवसंत खंडेलवाल, आमदार किरण सरनाईक, आमदार श्याम खोडे, विभागीय आयुक्त डॉ. ेशेता सिंघल, पोलीस महानिरीक्षक रामराव पोकळे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलिस अधिक्षक अर्जित चांडक आदि मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन, अद्ययावत व सुसज्ज इमारतीचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वागत कक्ष, हिरकणी कक्ष, आनंदी कक्ष, आवश्यक दस्तऐवज मिळण्यासाठी किऑस्क सुविधा आदींचे निरीक्षण केले. त्यानंतर नियोजन भवनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाचवेळी ऑनलाईन पध्दतीने विविध विकास कामांचा शुभारंभ झाला. अकोला येथील तहसील, तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अद्ययावत इमारतीचे तसेच महिला व बालविकास भवनाचे लोकार्पण झाले. पूर्णा नदीवरील काटीपाटी बॅरेज प्रकल्पाचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. सुमारे 454.62 कोटी रूपयांच्या निधीतून सिंचनाची व्यवस्था निर्माण होऊन शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. अकोला येथे 129.23 कोटी निधीतून पोलीस अधिकारी व कर्मचा-यांसाठी दक्षतानगर येथे 246 निवासस्थाने व परिसर विकासकामांमुळे कर्तव्याप्रती 24 तास बांधील असणा-या पोलीसांसाठी निवासाची सोय निर्माण होणार आहे. तसेच 5 कोटी खर्चाचे अकोला तालुका क्रीडा संकुल या कामांचे कोनशिला अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मेळघाटातील प्रतिकृती भेट देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमात विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांच्या अकोला विमानतळ येथे आगमनप्रसंगी पालकमंत्री ड. फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिष पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार किरण सरनाईक, माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, जिल्हाधिकारी अजित कुंभार आदींनी स्वागत केले.

संबंधित बातम्या

Back to top button