महानगरपालिका क्षेत्रात आयुष्मान गोल्डन कार्डची महाअभियान मोहीम

20 डिसेंबरपर्यंत सर्व नागरिकांसाठी मोठी संधी

अमरावती /2 डिसेंबर : देशभरातील सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षणाचा मजबूत कवच देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने लागू केलेल्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित लाभांचा लाभ अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचावा यासाठी 1 डिसेंबर 2025 ते 20 डिसेंबर 2025 या कालावधीत विशेष आयुष्मान गोल्डन कार्ड निर्माण व वितरण मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम युद्धपातळीवर राबवली जाणार असून अमरावती महानगर पालिका सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत संचालित 13 शहरी आरोग्य केंद्रांद्वारे नागरिकांचे ई-घधउ व कार्ड निर्मिती केली जाणार आहे. मोहीमेचा उद्देश-प्रत्येक नागरिकाला आरोग्य संरक्षण-आयुष्मान भारत योजनेअंतर्गत समाविष्ट प्रत्येक कुटुंबास प्रतिवर्षी 5 लाख रुपये पर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा आहे. या सुविधेचा लाभ फक्त आयुष्मान गोल्डन कार्डधारकांनाच मिळतो. कार्ड नसल्यास रुग्ण उपचारापासून वंचित राहू शकतो. महानगरपालिका क्षेत्रातील कार्ड निर्माणाचे प्रमाण राज्यात सर्वात कमी असल्याने ही मोहीम राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री वॉर रूम बैठकीत देण्यात आले. राज्यात पूर्वी राबवलेल्या विशेष मोहिमेत 10.01 लाख कार्डे तयार झाली असली तरी अजूनही मोठ्या संख्येने कुटुंबे वंचित आहेत.
मोहीम कशी राबविण्यात येणार?-1. प्रत्येक वॉर्डात कार्ड निर्मितीसाठी विशेष शिबिरे-महानगरपालिकेतील सर्व वॉर्डांमध्ये दररोज शिबिरे भरवली जातील. नागरिकांना आधार कार्ड व मोबाईल नंबरसह शिबिरास भेट देऊन त्वरित आयुष्मान कार्ड मिळवता येईल. 2. आशा सेविका व रेशन दुकानदारांची घराघरात मोहीम आशा सेविका, एएनएम, एमपीडब्ल्यू, स्वस्त धान्य दुकानचालक आणि आपले सरकार सेवा केंद्र कर्मचारी घराघरात जाऊन लाभार्थ्यांचे ई-घधउ करतील. प्रत्येक कर्मचार्‍याला दररोजचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून 100% कार्ड निर्मितीचा निर्धार करण्यात आला आहे. 3. इशपशषळलळरीू ङेसळप – नागरिकांना कार्ड स्वतः तयार करण्याची सुविधा नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड अ‍ॅपवर जावून स्वत: सुध्दा कार्ड तयार करुन काढू शकता. नागरिकांमध्ये जनजागृती करून मोबाईलवरून स्वतः कार्ड तयार करण्याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. अंगीकृत रुग्णालयातील आरोग्यमित्रांनाही कार्ड निर्मितीसाठी स्वतंत्र सूचना दिल्या आहेत. 4. रुग्णालयांमध्ये आरोग्य शिबिरे + ऑन-द-स्पॉट कार्ड निर्माण शहरातील सर्व शासकीय व खासगी अंगीकृत रुग्णालयांनी मोहीम कालावधीत आरोग्य तपासणी शिबिरे घेणे आवश्यक आहे.
या शिबिरांमध्ये उपचाराबरोबरच आयुष्मान कार्ड निर्माण व वितरण करण्यात येणार आहे. 70 वर्षां वरील नागरिकांसाठी खास – वयवंदना कार्ड 70 वर्षे व अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वयवंदना कार्ड ही मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे त्यांना अतिरिक्त 5 लाख रुपये वार्षिक संरक्षण मिळणार आहे (म्हणजे एकूण 10 लाखांचा लाभ).
कार्ड बनविणे अत्यंत सोपे -फक्त आधार कार्ड, आधार लिंक मोबाईल नंबरमहानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिक संघ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने वयवंदना कार्ड मोहिमाही जोरात राबवण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय व निमशासकीय कर्मचारी – कार्ड अनिवार्य सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे 5 लाख रुपयांचे संरक्षण लागू आहे. त्यासाठी आयुष्मान कार्ड अनिवार्य असल्याने सर्व कार्यालयांना कर्मचार्यांची कार्डे तातडीने तयार करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.
नागरिकांना आवाहन-अमरावती महानगरपालिका सर्व नागरिकांना आवाहन करते की, आपल्या जवळच्या शहरी आरोग्य केंद्रात भेट द्या ई-घधउ करून तात्काळ आयुष्मान गोल्डन कार्ड घ्या 70 वर्षांवरील नागरिकांनी वयवंदना कार्ड करून घ्यावे शिबिरांमध्ये, आरोग्यमित्रांकडे, आपले सरकार केंद्रात किंवा इशपशषळलळरीू ङेसळप च्या माध्यमातून कार्ड बनवा संपर्क हेल्पलाइन : 155388 / 1800 233 22 00, ई-मेल : लशेक्षशर्शींरपवरूशश.र्सेीं.ळप अमरावती महानगरपालिका नागरिकांना आवाहन करते की, आरोग्य संरक्षण तुमचा हक्क आहे. मोहिमेत सहभागी व्हा आणि तुमच्या कुटुंबाचे आयुष्मान कार्ड आजच तयार करून घ्या.

संबंधित बातम्या

Back to top button