घरफोडीतील आंतरराज्यीय चोरटे गजाआड
अमरावतीमधील गुन्ह्याची कबुली

गुन्हे शाखेची गुजरातमध्ये कारवाई
अमरावती/1 डिसेंबर – शहरातल्या आकोली परिसरात घडफोडी करणार्याय दोन सराईत आंतरराज्यीय आरोपींना मध्यप्रदेश व गुजरात येथून अटक करण्यात आली आहे. त्यांची अमरावतीत घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. पंकज दखने रा. सरदार पटेल नगर हे दोन दिवस मंगलधाम येथील त्यांचे नवीन घरी राहायला गेले होते. या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरांनी त्यांचे पटेल नगर येथील बंद घरात प्रवेश करून सोन्या चांदीचे दागीने व नगदी असा एकूण 8 लाख 68 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी सदर गुन्हा उघडकिस आणून आरोपी अटक करण्याकरीता गुन्हे शाखेच्या पथकाला आदेशीत केले होते.
पोलिसांनी तांत्रिक माहिती व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. राकेश केरमसींग बमनिया (वय 27 वर्ष), भवरींग सोमला बमनिया (वय 33 वर्ष) दोघेही रा. खाडा फलीया, बडीउटी, कुंडलवासा, अलीराजपुर, मध्यप्रदेश या दोघांची नावे समोर आली. सदर दोन्ही आरोपी हे गुजरात व मध्यप्रदेश अशा वेगवेगळया ठिकाणी असल्याबात माहीती मिळाल्याने तात्काळ सपोनि महेश इंगोले व पथकाला दोन्ही आरोपीना ताब्यात घेण्यासाठी रवाना करण्यात आले. सलग 5 दिवस पाठलाग करून एकाला ग्राम फलीया व दुसर्याला भावनगर येथून ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. दोन्ही आरोपींना पुढील तपासकामी पो.स्टे. बडनेरा यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सध्या 62 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई उपरोक्त अधिकार्यांतसह सपोनि अनिकेत कासार, प्रियंका कोटावार, सतिश देशमुख, गजानन ढेवले, मनोज ठोसर, संग्राम भोजने, विकास गुडधे, रंजीत गावंडे, योगेश पवार संदीप खंडारे, प्रभात पोकळे, सुषमा आठवले यांच्या पथकाने केली.




