तिजोरी जनतेची, माझ्यापेक्षा मुख्यमंत्र्यांकडे जास्त अधिकार

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवड णुकीच्या पार्श्व भूमीवर सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडण वीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री हे सध्या प्रचार सभांच्या दौर्यावर आहेत. अशामध्ये महायुतीमधील तीनही घटकपक्ष हे अनेक ठिकाणी स्वतंत्र लढत असल्याचे चित्र असताना स्थानिक पातळीवर नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एक विधान सध्या चांगलेच चर्चेत राहिले आहे. त्यांनी, माझ्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत असे विधान केले होते. त्यांनी केलेल्या या विधानामुळे महायुतीत नाराजीचे सूर उमटले.




