2016 मध्ये भाजपा नगराध्यक्षासह 16 नगरसेवकांचा झाला होता विजय
तत्कालिन नगराध्यक्ष रविंद्र थोरात यांचेसह अनेकांना चाखावा लागला होता पराभव

वरुड । 27 नोव्हेंबर – गेल्या 2016 मध्ये पार पडलेल्या वरुड नगरपरिषद निवडणकीत भाजपने सत्ता राखून जोरदार मुसंडी मारत विजयश्री खेचून आणली होती. नगराध्यक्षपदासह तब्बल 16 नगरसेवक विजयी झाले होते तर राष्ट्रीय काँग्रेस 4, राष्ट्रवादी काँग्रेस 2, प्रहार 1, वरुड विकास आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले होते.
वरुड नगरपरिषदेच्या नगरध्यक्षापदासह 24 नगरसेवकांच्या पदाकरीता 27 नोव्हेंबर 2016 ला झालेल्या मतदानाची मतमोजणी नगरपरिषद सभागृहात पार पडली होती. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने आपल्या सर्वच विरोधकांना शह देत मोठा विजयश्री खेचून आणला होता. भारतीय जनता पार्टीच्या स्वाती युवराज आंडे या नगराध्यक्ष म्हणुन निवडून आल्या होत्या तर नगरसेवक म्हणुन नलिनी प्रकाश रक्षे, शुभांगी भारत खासबागे, किशोर मोतीराम भगत, मंदा संजय आगरकर, छाया सुरेश दुर्गे, मनोज गुलाबराव गुल्हाने, देवेंद्र भाऊराव बोडखे, पुष्पा नरेंद्र धकिते, रेखा राजेंद्र काळे, राजु गणपत सुपले, सुवर्णा सुनिल तुमराम, अॅड.योगेश भा.चौधरी, अर्चना नंदकिशोर आजनकर, हरिष राजेंद्रप्रसाद कानुगो, भारती प्रकाश माळोदे, नरेंद्र बापूराव बेलसरे हे विजयी झाले आहेत तर राष्ट्रीय काँग्रेसचे प्रशांत प्रल्हाद धुर्वे, नुरोन्नीसा मोबीनोद्दीन काजी, कांता शंकर गवई, शाहीदा बेगम मोहम्मद अश्पाक हे उमेदवार विजयी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र कृष्णराव देशमुख, फिरदोसजहाँ अन्सार बेग हे दोन विजयी झाले तर प्रहारचे सौरभ सुशिल तिवारी व वरुड विकास आघाडीचे उमेश आत्माराम यावलकर यांनी विजयश्री खेचून आणली होती.भाजपाने गड राखला असला तरी मात्र तत्कालिन नगराध्यक्ष रविंद्र थोरात यांचा पराभव झाल्याने गड आला पण सिंह गेला अशी अवस्था भाजपाची झाली होती तर दुसरीकडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर माहोरे, न.प.बांधकाम समिती सभापती विलास उघडे, माजी उपाध्यक्ष कैसरजहाँ, विद्यमान नगरसेवक चंदू कडु, अॅड.आशिष घाटोळे यांचेसह अनेकांना पराभव चाखावा लागला होता.




