नगराध्यक्षासाठी 6 नगरसेवकांसाठी 141 उमेदवार रिंगणात

छाननी दरम्यान मोर्शी नगरपरिषदेमध्ये स्थिती स्पष्ट

मोर्शी /21 नोव्हेंबर : येथील नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी झालेल्या अंतिम छाननी दरम्यान नगराध्यक्ष पदाच्या 10 उमेदवारांपैकी 4 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे नगराध्यक्ष पदाकरिता सहा उमेदवार रिंगणात असून नगरसेवक पदासाठी 153 उमेदवारांचे अर्ज होते यामधील 12 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे त्यामुळे 141 उमेदवार नगरसेवक पदाकरिता रिंगणात आहे. 21 नोव्हेंबरला मागे घेणार्‍या उमेदवारांची नावे 1) अजमेरे स्मिता प्रदीप 2) वसंत कांचन दिनेश 3) महल्ले प्रतिभा निलेश 4) चिखले वर्षा दिलीपराव हे असून नगराध्यक्ष पदाकरिता नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये निवडणूकीत रिंगणात असणार्‍या उमेदवारामध्ये सौ रेशमा नितीन उमाळे भाजपा, सौ सोनल निलेश रोडे अपक्ष, सौ प्रतीक्षा रवींद्र गुल्हाने शिवसेना शिंदे, सौ दिपाली विपुल भडांगे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, फरजानबी हैदर शहा बहुजन समाज पार्टी, दर्शना आशिषराव टाकोडे अपक्ष, हे उमेदवार या निवडणुकीतील मैदानात उभे आहे. छाननीअंती नगरसेवक पदासाठी 141 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज कायम तर नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवारी अर्ज कायम नगराध्यक्ष पदाकरिता बहुतांशी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे या निवडणुकीत रंगत वाढणार असल्याची चर्चा जनमानसात दिसून येते.

संबंधित बातम्या

Back to top button