सहआयुक्त तिखिले व उपअभियंता अवसरे यांचे निलंबन करा
मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांची दिशाभूल करणार्या

सुरेश बोबडे यांची पत्रकार परिषदेत मागणी
अमरावती / 20 नोव्हेंबर : गाडगे नगरातील शाईन होंडा शोरूम मागे गल्ली क्रमांक एक मध्ये खाजगी आजोळ हॉस्टेल व अभ्यासिका या इमारतीच्या अतिक्रमण संदर्भात परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या मात्र सहायक आयुक्त तिखिले व उपअभियंता अवसरे यांनी मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांची दिशाभूल करून व आपल्या पदाचा गैरवापर करून प्रणव कापगते यांच्या इमारतीत असलेल्या खाजगी आजोळ हॉस्टेल व अभ्यासिका याबाबत कर्तव्यात गेल्या अनेक वर्षापासून कसूर करीत असल्यामुळे त्यांना निलंबित करावे अशी मागणी करित अन्यथा स्थानिक रहिवासी होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे तक्रार कर्ते सुरेश मधुकर बोबडे यांनी श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले सुरेश मधुकरराव बोबडे हे गाडगे नगरातील शान होंडा शोरूम मागे गल्ली क्रमांक एक मध्ये राहतात जवळपास पंधराशे मीटरची ही अरुंदगल्ली असून पाच ते सहा कुटुंब गेल्या 20 ते 30 वर्षापासून या परिसरात गुण्यागोविंदाने राहतात. याच ठिकाणी प्रणव कापगते यांनी घर विकत घेऊन त्या ठिकाणी खाजगी आजोळ होस्टेल व अभ्यासिका सुरू केलेली आहे अभ्यासिकेत येणारे विद्यार्थी हे मनमानी वागतात व त्यांच्या वाहनांकरिता कोणतीही पार्किंगची व्यवस्था या अभ्यासिकेसमोर केलेली नाही त्यामुळे विद्यार्थी नागरिकांच्या दारासमोर वाटेल तेथे वाहने उभी करतात तासंतास मोबाइल फोन वर बोलत बसतात,जोरजोराने गाणे वाजवतात त्याच्यावर व्यवस्थापकाचे कोणतेही नियन्त्रण नाही,त्यामुळे परिसरातील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो त्याचप्रमाणे प्रणव काप्गते यांनी अनधिकृत पणे बांधकाम करून विनापरवाना आजोळ अभ्यासिका सुरू केली असून हे अतिक्रमण काढण्यासंदर्भात तक्रारी सुद्धा केल्या होत्या अतिक्रमण विभागाचे कोल्हे यांनी सन 2024 मध्ये अतिक्रमण टीन सेड काढले होते परंतु दोन महिन्यांनी परत लावण्यात आले या संदर्भात अतिरिक्त आयुक्त नाईक मॅडम यांनी 27 नोव्हेंबर 2024 रोजी दोन्ही पक्षांची पोलिसा समक्ष सुनावणी घेतली असता त्या सुनावणीचे सुद्धा गैरअर्जदाराकडून सप्टेंबर 2025 मध्ये उल्लंघन करून विद्यार्थ्यांकरिता टिनशेड पुन्हा सुरू केले कहे,असा आरोप या पत्रकार परिषदेत सुरेश मधूकर बोबडे यांनी केला आहे यासंदर्भात माननीय आयुक्त सौम्या शर्मा यांना जुलैपासून ते नोव्हेंबर पर्यंत समक्ष भेटून लागोपाठ पाच वेळा निवेदन दिल्यानंतर मनपा आयुक्त यांनी फोन द्वारे व तसेच निवेदनावर कार्यवाही करणे बाबत सेरा मारला असून पाचही अर्जावर झोन क्रमांक एक चे अधिकारी सह आयुक्त तिखिले व उपअभियंता अवसरे यांनी मनपा आयुक्त यांचे आदेशाची कोणतीही अंमलबजावणी केलेली नाही, या संदर्भात परिसरातील रहिवासी राऊत ,कोल्हे ,अग्रवाल यांनी सामूहिक सह्या करून सन 2022 पासून अर्ज देऊन सुद्धा प्रणव का पगते यांच्या अतिक्रमणावर कोणतीही कारवाई केलेली नाही किंवा बाजार परवाना विभागाने सुद्धा याकडे लक्ष केंद्रित केले नाही व अतिक्रमित भिंतीवर कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे संबंधित अधिकारी हे स्वतः आपल्या आयुक्तांना अतिक्रमित भिंतीबाबत व कमर्शियल व्यवसाय बाबत खोटी माहिती पूरवित असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे.
उपअभियंता अवसरे यांनी आपण वारंवार अर्ज करू नये शासनास अडथळा होत आहे असे पत्र देत तक्रारीचा मार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला आहे ,संबंधित अधिकारी हे गैरअर्जदार कापगते यांच्याकडून पैसे घेऊन गैर अर्जदारावर कारवाई करण्याऐवजी त्यांचे समर्थन करीत असल्याचे व आपल्याच आयुक्तांना खोटी माहिती पुरवीत असल्याचा गंभीर आरोप बोबडे यांनी दिलेल्या प्रेस नोट मध्ये केला आहे तरी मनपाआयुक्तांनी तात्काळ नमूद विषयातील दोन्ही अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा स्थानिक नागरिकासह होऊ घातलेल्या मनपा निवडणूकीवर बहिष्कार करणार आहे असे सुद्धा पत्रकार परिषदे मध्ये जाहीर केले आहे.




