आज साई चांडूराम साहिबजींच्या अस्थिकलश यात्रेला अमरावतीतून शुभारंभ
देशभरातील 25 जिल्ह्यातुन निघणार अस्थिकलश यात्रा

* दिवसभर दर्शनासाठी आध्यात्मिक कार्यक्रमाची रेलचेल
अमरावती /6 नोव्हेंबर – संत परंपरेतील तेजस्वी व्यक्तिमत्त्व आणि ब्रम्हलीन संत आसुदाराम साहिबजींचे अनन्य शिष्य साई चांडूराम साहिबजी यांच्या देवलोक गमनानंतर त्यांच्या अस्थिकलशाचे दर्शन देशभरातील भक्तांना घेता यावे, या हेतूने देशातील 25 जिल्ह्यांत अस्थिकलश यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेची आज अमरावतीतून सुरुवात होत असून संपूर्ण शहर आज दिवसभर भक्तीमय वातावरणाने नटणार आहे. लखनऊहून सकाळी अस्थिकलश नागपूर येथे आणले जात आहेत. त्यानंतर सकाळी 11 वाजेपर्यंत अस्थिकलश भानखेडा येथील कंवरधाममध्ये पोहोचेल. धार्मिक विधीनुसार पूजा-अर्चना करून अस्थिकलश भक्तांच्या दर्शनार्थ ठेवण्यात येणार आहेत. दर्शनानंतर भक्तांसाठी लंगर प्रसादीचे आयोजन केले आहे. दुपारनंतर अस्थिकलश शहरातील विविध धार्मिक स्थळांवर नेण्यात येतील. सायंकाळी 5 वाजता दस्तूर नगर, गली क्र. 2 येथील समाज मंदिरात प्रथम दर्शन होईल. त्यानंतर शदानी दरबार, शिवधारा आश्रम, पूज्य दरबार साहिब कंवर नगर, समाधा आश्रम आणि शेवटी रात्री 8 वाजता एसएसडी धाम येथे अस्थिकलश नेण्यात येतील. प्रत्येक ठिकाणी प्रार्थना, भजन आणि भक्तीमय कार्यक्रम होणार आहेत. यात्रेच्या निमित्ताने पूज्य पंचायत कंवर नगर, दस्तूर नगर, रामपुरी कॅम्प, बडनेरा तसेच विविध धार्मिक संस्थांना दर्शनासाठी आवाहन करण्यात आले आहे. सर्व समाजबंधूंनी संतांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संत बाबा आसुदाराम सेवा समितीने केले आहे. अमरावतीतील दर्शन यात्रेनंतर अस्थिकलश नागपूरला रवाना होतील. रविवार, 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता नागपूरच्या तीरथ धाम येथेही भक्तांना दर्शन लाभ मिळणार आहे. अस्थिकलश यात्रेच्या तयारीसाठी गुरुवारी बाबा हरदासराम सेवा मंडळात समीक्षा बैठक झाली. यात दर्शनव्यवस्था, सुरक्षा, वाहतूक, भोजन, धार्मिक कार्यक्रम या सर्व जबाबदार्या संबंधित समित्यांना सोपवण्यात आल्या आहेत. शहरात आज दिवसभर श्रद्धा आणि भावनेचा एक अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.
* अस्थिकलश यात्रा कार्यक्रम
शनिवार, 8 नोव्हेंबर सकाळी 8:00 नागपूर येथून अमरावती प्रस्थान
शनिवार, 8 नोव्हेंबर सकाळी 11:00 भानखेडा स्थित कंवरधाम, अमरावती
शनिवार, 8 नोव्हेंबर दुपारी 12:00 कंवरधाम परिसर – भजन, कीर्तन व लंगर प्रसाद
शनिवार, 8 नोव्हेंबर सायं. 5:00 दस्तूर नगर, गली क्र. 2, समाज मंदिर
शनिवार, 8 नोव्हेंबर सायं. 5:30 शदानी दरबार, सिंधू नगर
शनिवार, 8 नोव्हेंबर सायं. 6:30 शिवधारा आश्रम
शनिवार, 8 नोव्हेंबर सायं. 7:00 पूज्य दरबार साहिब, कंवर नगर
शनिवार, 8 नोव्हेंबर सायं. 7:30 समाधा आश्रम, राजापेठ
शनिवार, 8 नोव्हेंबर रात्री 8:00 भजन, कीर्तन, लंगर व मुक्काम
रविवार, 9 नोव्हेंबर सकाळी 9:00 तीरथ धाम, नागपूर येथे प्रस्थान




