मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभिनंदन बँक इमारतीचे गुरुवारी लोकार्पण

अमरावती /28 ऑक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी अभिनंदन बँक इमारतीचे लोकार्पण होणार आहे. सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्था असलेल्या अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या स्वमालकीच्या मुख्य कार्यालय इमारती ‘अभिनंदन हाईट्स’चा लोकार्पण सोहळा गुरुवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता श्री ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात पार पडणार आहे.
या सोहळ्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुलभा खोडके आणि आमदार रवी राणा उपस्थित राहणार आहेत. बँकेचे अध्यक्ष विजय बोथरा अध्यक्षस्थानी राहतील. तसेच या कार्यक्रमाला भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था आणि पगारिया ग्रुपचे अध्यक्ष उज्ज्वल पगारिया विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.




