मेहुल चोक्सीला बेल्जियमच्या कोर्टाचा झटका

मुंबई – पंजाब नॅशनल बँकेच्या सुमारे 13 हजार कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणातील फरार आरोपी महे लु चाकेसी याला भारतात आणण्याचा मागणीचा टप्पा यशस्वी झाला आहे. शुक्रवारी बेल्जियमच्या एका न्यायालयाने हिरा व्यापारी महे लु चाकेसी याचं भारताकडे प्रत्यर्पण करण्यास मान्यता दिली. तसेच, न्यायालयाने बेल्जियमच्या अधिकार्यांकडून झालेल्या तपासानंतर त्याची अटक योग्य असल्याचा निर्णय दिला आहे. या प्रकरणाबाबत माहिती असलेल्या एका अधिकार्याने सांगितले की, महे लु चाकेसी याला भारतात आणणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तसेच, महे लु चाकेसीकडे अद्याप वरिष्ठ न्यायालयात या निर्णयाच्या विरोधात अपील करण्याचा पर्याय आहे, असेही अधिकारी सांगत आहेत.




