मराठा आरक्षणाचा जीआर फक्त मराठवाड्यापुरताच

ओबीसी मोर्चावर बावनकुळे यांची स्पष्टीकरण

* खरा कुणबी असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळेल

नागपूर /10 ऑक्टोबर : मराठा आरक्षणाबाबत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे. भाजप मंत्री म्हणालेत की मराठा आरक्षणाचा जीआर फक्त मराठवाड्यापुरताच लागू असून त्यामुळे राज्यातील इतर मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, असा प्रश्न मराठा बांधवांना पडला आहे. नागपुरात झालेल्या ओबीसी मोर्चावर प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधान केलं. नागपुरातील ओबीसी मोर्चात ओबीसी समाजाची पुन्हा एकदा नियोजितपणे दिशाभूल करण्यात आली असून दोन सप्टेंबरचा जीआर फक्त मराठवाड्यापुरता मर्यादित आहे; हा जीआर मराठवाड्याबाहेर लागू नाही. बैठक झाली तेव्हा वडेट्टीवार आणि इतर प्रतिनिधी आले होते आणि प्रत्येक मुद्द्यावर शिष्टमंडळाचा संभ्रम आणि गैरसमज दूर केला. या जीआरचा कुणाची दुरुपयोग होणार नाही, जो खरा कुणबी त्यांनाच सर्टिफिकेट मिळेल, असे बावनकुळे म्हणालेत. ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही आणि ओबीसी समाजाला कुठलाही धक्का लागणार नाही, असे वचन शिष्टमंडळाला दिले आहे. त्यांनी सांगितले की, जर त्यांना अजून खुलासे हवे असतील किंवा स्पष्टीकरण हवे असेल तर आम्ही ते देण्यासाठी तयार आहोत. हा जीआर केवळ मराठवाड्यापुरता मर्यादित असून राज्यात कुठेही लागू नाही. बावनकुळे म्हणाले की ओबीसी समाजाची दिशाभूल थांबवली पाहिजे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सरकारवर टीका करत सांगितले की, त्या वेळी आबेसी समाजाला आरक्षण देण्यात आले, पण फडणवीसांच्या सत्तेत ओबीसींना पन्हु आरक्षण मिळवून दिले. सत्तेत असताना काही करण्याची गरज नाही, आणि सत्ता गेल्यानंतर कागदावरून मुद्दा उठवायचा नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button