मनपा प्रारूप सुनावणी : दुसर्‍या दिवशीही मोठी गैरहजेरी

50 पैकी केवळ 27 जणांचा सहभाग

-आपत्तीकर्त्यांची अरुची, अंतिम दिवस आज
अमरावती / 18 सप्टेंबर : महानगरपालिकेच्या प्रभागरचनेवर झालेल्या आक्षेप-आपत्त्यांच्या सुनावणीचा दुसरा दिवस आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. मात्र, दुसर्‍या दिवशीही आपत्तीकर्त्यांचा मोठा हिस्सा हजर न राहिल्याने त्यांच्या भूमिकेकडेच दुर्लक्ष झाल्यासारखी परिस्थिती उद्भवली आहे. अर्ज करणार्‍या 50 जणांपैकी केवळ 27 जणच सुनावणीत सहभागी झाले, तर 23 जण अनुपस्थित राहिले. यापूर्वी, बुधवारी पहिल्या दिवशी 40 पैकी केवळ 30 आपत्तीकर्तेच आले होते. एकंदर 90 आपत्त्यांवर झालेल्या दोन दिवसांच्या सुनावणीत 33 आपत्तीकर्ते उपस्थित झालेले नाहीत.
मनपाच्या आगामी निवडणुकांसाठी मिळालेल्या एकूण 133 आक्षेपांपैकी पहिल्या दोन दिवसांत 90 आपत्त्यांवर सुनावणी पूर्ण झाली आहे. आता उर्वरित 43 आपत्त्यांची सुनावणी शुक्रवार, 19 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. सुनावणीचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय व मनपा प्रशासन एकत्रितपणे अंतिम प्रभागरचना प्रस्ताव नगरविकास विभागामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहेत. आयोगाने अंतिम प्रभागरचना निश्चित केल्यानंतर मनपा निवडणुकीची अधिसूचना जाहीर होणार आहे.
आजच्या सुनावणीत जिल्हाधिकारी आशीष येरेकर, मनपा आयुक्त सौम्या शर्मा तसेच नगरविकास विभाग व मनपा निवडणूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक आक्षेप संबंधित प्रभागाचा नकाशा मोठ्या पडद्यावर दाखवत ऐकून घेण्यात आला. प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या आपत्तीकर्त्यांना त्यांचा पक्ष मांडण्याची संधी देण्यात आली व प्रत्येक प्रकरणावर स्वतंत्रपणे चर्चा होऊन सुनावणी पूर्ण करण्यात आली.
-यांच्या आक्षेपांवर झाली सुनावणी
आज दुसर्‍या दिवशी आपत्ती क्रमांक 41 ते 90 वर सुनावणी घेण्यात आली. या कालावधीत खालील अर्जकांच्या प्रभागनिहाय आक्षेपांवर चर्चा झाली. त्यामध्ये दिलीप धोटे (वडाळी), प्रफुल देशमुख, अतुल ठाकरे (मंगलधाम), नीलेश रमतकार, किरण गुडधे (प्रशांत नगर), घनश्याम बडवाईक (प्रशांत नगर), अमर ठाकरे, वैभव देशमुख (राजेंद्र कॉलनी), आशीष देशमुख (श्याम नगर), शरद कुबडे, शैलेश नांदुरकर (जिप कॉलनी), प्रवीण खानपासोले (शिक्षक कॉलनी), अरुण महल्ले (मुदलियार नगर), मिलिंद पाटील (कृषक कॉलनी), मिलिंद चिमोटे, रोहण चिमोटे, कोमल बोथरा, यश चोरडिया (श्रीकृष्णपेठ), प्रितम चक्रे (अशोक नगर), रिता पडोले, वंदना हरणे (माजी नगरसेविका), प्रा. डॉ. अजय बोडे (महालक्ष्मी नगर), सरोज चिखलकर (छांगाणी नगर, राममंदिर रोड), लक्ष्मण लाठेकर, डॉ. सागर धानोरकर, रविंद्र गुलवाडे, अतुल गिरी, अजय गुल्हाने, अतुल ठाकरे, अमोल भड, मनोज ढगे, महेश ठवकर, प्रेमदेव शिंगणापूरे, अजय गुल्हाने (सामरा नगर), शुभम जनबंधु (सामरा नगर), शिवपालसिंह ठाकुर (सामरा नगर), विशाल विठ्ठलराव आगारे, रुतुजा मयुरराव देऊलकर (गणपति नगर), आदेश मोहोड (गोदावरी कॉलनी), मदन राठोड, आदित्य इंगले (सूतगिरणी प्रभाग), गजानन नांदुरकर (खारकर लेआऊट), सुचित जाधव (ठाकुरवाडी), पीयूष इंगले (बोंडे लेआऊट), माणिक लोखंडे (बागडे लेआऊट), मयुर वासनिक, सुमेध जामनेकर (राजेंद्र नगर), वैभव अंबुलकर (गजानन नगर), प्रशिक चौव्हाण (ग्रेटर कैलास नगर), चेतन धांडे (प्रभाग क्र. 7), यांचा समावेश होता.

संबंधित बातम्या

Back to top button