राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कार शिबिरास डॉ. गोविंद कासट यांची भेट

अमरावती /28 मे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शहरातील विविध सहा नगरांमध्ये तपोवन, देवी नगर, बालाजी नगर, बजरंग टेकडी, बडनेरा, म्हाडा कॉलनी, इंद्रायणी नगर, हिरा कॉलनी, सोमेश्वर नगर, गांधी आश्रम येथे बालसंस्काराचे आयोजन केले आहे.
महानगर सेवा प्रमुख उमेश वैद्य यांच्या सूचनेवरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गोविंद कासट यांनी नुकतेच या शिबिरांना भेट देऊन समाधान व्यक्त केले. ध्वज वंदना प्रार्थना भारत माता प्रतिमापूजन नंतर शिबिराची माहिती जाणून घेत त्यांनी बालगोपालांसाठी मार्गदर्शक अशा कथा सांगितल्या. यावेळी त्यांचा परिचय उमेश वैद्य यांनी करून दिला. याप्रसंगी नगर कार्यवाहक सुनील गुंडे नगरसेवक प्रमुख विजय माने बौद्धिक प्रमुख नितीन गोंधळेकर वर्गशिक्षिका अर्चना डोईफोड इत्यादी मंडळी सह प्रशांत कुंटे दीपक लोखंडे प्रफुल बोके मनोहर साखरे पवन चिंचोळकर सचिन तुपट सुनील मोहनकर चतुर बागडे व 38 बालगोपाल मुले मुली हजर होते.

Back to top button