महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग उपचार केंद्र!

मुंबई : सध्या कर्करोगामुळे अनेक लोकं मृत्युमुखी पडतात. याला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर कर्करोग उपचार सेवा देण्यासाठी एक व्यापक धोरण तयार करण्याचे निर्देश राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाला दिले आहेत. वर्षा बंगल्यावर तज्ञांसोबत बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये व्यापक कर्करोग उपचार सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. कर्करोगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध पातळ्यांवर कर्करोग उपचार केंद्रे स्थापन करणे आवश्यक आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button