जिवंत वीज ताराच्या स्पर्शाने शेळी दगावली
शेळीपालन शेतकर्याचे नुकसान:दापोरी येथील घटना

तिवसा /26 मे: तालुक्यातील दापोरी शेत शिवारात दि.25 रोजी वादळी वार्यामुळे वीज वितरणच्या विद्युत खांबावरील जिवंत वीज तार तुटून पडल्याने वीज ताराचा स्पर्शाने एक शेळी दगावल्याची घटना घडली.ज्यामुळे सतीश वावरे या शेळी पालन शेतकर्यांचे पंधरा हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.
नेहमी प्रमाणे सकाळी आपल्या दहा ते बारा शेळ्या गावा लागत असलेल्या शेत शिवारात चराईसाठी गेल्या होत्या. दरम्यान दुपारी अचानक झालेल्या वादळी वार्यामुळे दापोरी येथील काही विद्युत खांबावरील जिवंत तार जमिनीवर तुटून पडल्या होत्या.यावेळी शेळ्या चरत असताना एका शेळीला या जिवंत वीज ताराचा स्पर्श झाला ज्यामुळे शेळीचा जागीच तडफडून मृत्यू झाला.घटनेची माहिती तिवसा वीज वितरण विभागासह पशु वैद्यकीय अधिकारी यांनी देण्यात आली.यावेळी शेळीचे शवविच्छदन करण्यात आले असून शेळीपालन शेतकरी सतीश वावरे यांनी तिवसा वीज वितरण विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी तक्रारीतून केली आहे.