भारतामध्ये राहणारा प्रत्येकजण हिंदूच : मोहन भागवत

डीएनए आणि पूर्वज समान असल्याचा दावा

अंबिकापूर / 26 ऑगस्ट : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्तीसगडच्या अंबिकापूर येथे झालेल्या स्वयंसेवकांच्या एका कार्यक्रमात स्पष्टपणे सांगितले की, भारतामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. कारण सर्व भारतीयांचा डीएनए सारखाच असून त्यांचे पूर्वजही एकच आहेत. मात्र याचा अर्थ कोणालाही आपली धार्मिक श्रद्धा वा पद्धती बदलण्याची आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले.
भागवत यांनी विविधतेमधून एकतेकडे जाणा-या भारतीय संकल्पनेवर भर देत, हिंदुत्व ही जगातील एकमेव अशी जीवनविचाराची संकल्पना आहे जी सर्वांना सोबत घेऊन जाते. हजारो वर्षांपासून ह्याच भूमीने वेगवेगळ्या श्रद्धा, संस्कृती आणि जीवनशैली एकत्र आणल्या आहेत. त्यावरच आपले एकत्व टिकून आहे, असे नमूद केले. ते पुढे म्हणाले की, हिंदुत्व ही केवळ धार्मिक संकल्पना नसून ती जीवनशैली आहे. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने उपासना करावी आणि आचरण करावे, परंतु इतरांच्या श्रद्धेवर आघात करू नये. प्रत्येकाचा मार्ग शेवटी एका समान ठिकाणी घेऊन जातो; त्यामुळे सर्व मार्गांचा आदर करा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी भागवत यांनी कोरोनाकाळातील अनुभवाचा उल्लेख केला. संकटाचा सामना करण्यासाठी देशाने एकजुटीने काम केल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आपण आंतरकलह करत असतो, मतभेद असतात, पण जेव्हा मोठे संकट येते तेव्हा आपली संस्कृती आपल्याला एकत्र आणते. कोरोनाकाळाने हे पुन्हा अधोरेखित केले, असे ते म्हणाले. संघाचे कार्य काय, याचाही उल्लेख त्यांनी केला. व्यक्ती घडवणे, त्यांचा चारित्र्य विकास करणे आणि प्रत्येकाला एकत्र आणून राष्ट्रीय एकता साधणे हेच संघाचे खरे ध्येय आहे, असे भागवत

संबंधित बातम्या

Back to top button