विविध मागण्याचे पुर्ततेसाठी धरणे आंदोलन

लोकविकास संघटनेचे तहसिलदारांना निवेदन

-तहसिलदारांच्या अनुपस्थीतीत महिला कर्मचार्यांने घेतले निवेदन
चांदूरबाजार /26 मे: तालुक्यातील विविध समस्या कडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी लोकविकास संघटनेतर्फे तहसिल कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.तहसिलदार रामदास शेळके यांच्या कार्यालयातील अनुपस्थीतीमुळे कार्यालयातील महिला कर्मचानी विविध मागण्याचे निवेदन स्विकारले. या मागण्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
विविध मागण्यात शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्या, मंजुर पांदन रस्ता चे काम तात्काळ सुरु करावे,अर्धवट पार्दन रस्ते पूर्ण करा, खरीप हंगामात शेतकर्‍यांना चांगले बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे,कृषी केंद्रा मध्ये मिळणार्‍या बोगस बियाण्यावर अंकुश लावा,चांदूर बाजार तालुक्यातील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयातील अधिकारी यांनी मुख्यालयी हजर राहण्यास सक्ती करणे, चांदूर बाजार नगर पालीकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा., तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिककामासाठी लागणारे कागदपत्रे तहसिल कार्यालयात तात्काळ उपलब्ध करून द्यावे., बे घर व जागा उपलब्ध नसलेल्या नागरिकांना जागा उपलब्ध करून घरकुलचा लाभ द्या.,जसापुर ते चांदूरबाजार बंद पडलेले काँक्रीट रस्त्याचे काम तात्काळ सुरू करून काम नियमानुसार करा, निराधारांचे अनुदान तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करा, नुकत्याच अवकाळी पावसाने शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तात्काळ मदत करा.,
रोजगार हमी अंतर्गत करण्यात आलेल्या गाय गोठा, शेळी शेड, व कुक्कुटपालन शेड चे अनुदान तात्काळ देण्यात यावे.,चांदूर बाजारचे तहसिलदार, नायब तहसिलदार, पुरवठा अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने आपात स्थीतीत अडचण येण्याची शक्यता लक्षात घेता यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश द्यावे, मध्यप्रदेशातील अवैध मुरूमाची ओव्हरलोड वाहतुक बंद करण्यात यावी.,
चांदूर बाजार तालुक्यासह शहरात भुमिअभिलेख कार्यालयात शेतकर्‍यांचे अनेक प्रकरणे प्रलंबीत ते निकाली काढण्यात यावे या विविध मागण्याचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.यावेळी लोकविकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल भालेराव,विजय राऊत, ऋषिकेश रडके, दत्तराज विचे, रवी काशीकर, आकाश खेलदार, प्रीतम मानापुरे, बाळासाहेब निंभोरकर, प्रविण गेडाम, अमोल देशमुख, तुषार गणोरकर, प्रमोद घाटोळ, धीरज तायवाडे, संतोष भेले, श्यामलाल ठाकरे, इमरान सौदागर, आदी शेकडो नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button