तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या युवतीची रहस्यमय आत्महत्या

जूना धामणगांवमधील घटना

-कुटुंबियांकडून अद्याप आक्षेप नाही
धामणगांव रेल्वे / 22 ऑगस्ट : दत्तापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जूना धामणगांव ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे आज दुपारी एक खळबळजनक घटना घडली. केवळ तीन महिन्यांपूर्वी विवाह केलेल्या आशिया शेख नजर (वय 20) या युवतीने आपल्या घरच्या बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, त्वरित पंचनामा करून तपास सुरू केला आहे. मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मृतक आशिया शेख नजर यांचा विवाह जूना धामणगाव येथील शेख नजर यांच्यासोबत गेल्या मे महिन्यातच झाला होता. घराबाहेर ती फार कमी वेळा निघायची, अशी माहिती मिळाली आहे. घटना उघडकीस आल्यावर दत्तापुर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि प्राथमिक पडताळणी सुरू केली. आशियाच्या माहेरचे लोक मंगरूल दस्तगीर येथून घटनास्थळी दाखल झाले होते, मात्र त्यांनी सायंकाळी उशिरापर्यंत कोणताही आक्षेप किंवा आरोप केलेला नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button