महेंद्र कॉलनी गुरुकुल विद्यावर्धनी स्कुल येथे सुसंस्कार शिबीर
स्वरश्री फाऊंडेशन व कला निर्मिती आर्ट क्लासेस चे आयोजन

अमरावती /25 मे: स्वरश्री फाऊंडेशन (संचालक ह.भ.प.श्री हेमंत अमृते सर) तथा चित्र जागृती कला वर्ग व कला निर्मिती आर्ट क्लासेस (संचालिका सौ.पुजा डहाके मँडम) या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यामाने 15 मे/2025 ते 31 मे 2025 पर्यंत सर्वांगीण सुसंस्कार शिबीर गुरुकुल विद्यावर्धनी स्कुल महेंद्र कॉलनी अमरावती येथे सुरु आहे. त्यामधे योगासने / प्राणायम, तबला हार्मोनियम भजन गायन भाषण प्रबोधन चित्रकला, क्राप्ट सामुदायीक प्रार्थना असे बरेचं विषय शिकविल्या जात आहे या शिबीराचे उद्घाटन दि 15 मे रोजी संपन्न झाले, उद्घाटन प्रसंगी सन्मा श्री पंजाबराव ढवक, श्री अशोकरावजी अमृते, श्री चोरे काका व संपुर्ण पालकवर्ग उपस्थीत होता.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री हेमंत अमृते यांनी केले आभार प्रदर्शन सौ, निलांबरी हाडोळे यांनी केले या कार्यक्रमाकरिता श्री निलेश भटकर श्री डहाके सर, श्रवण कोंडे. युवराज चव्हाण, कार्तिकय अंबाडकर आदींनी खुप परिश्रम घेतले.