नागपूर-पुणे वंदे भारत देशातील सर्वांत लांब पल्ल्याच्या गाडीला प्रारंभ
मोदींच्या हस्ते तीन वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन

* गडकरी व फडणवीस यांच्या हस्ते नागपूरात शुभारंभ
* अजनीच्या फलाट क्रमांक 8 वर भव्य आयोजन
*16 तासांचा प्रवास 12 तासांत होणार
*संतनगरी शेगावात थांबा दिल्याने भक्तांमध्ये आनंद
नागपूर /10 ऑगस्ट : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हस्ते रविवारी सकाळी 11.33 वाजता दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने येथील मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय आमदार मोहन मते, खोपडे, प्रवीण दटके, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांच्यासह मध्य रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभ प्रसंगी केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थी वंदे भारत मधून बडनेरा पर्यंतचा प्रवास केला. तत्पूर्वी रेल्वेकडून प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवादप्रणालीद्वारे आज नागपूर (अजनी) -पुणे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. तसेच याच कार्यक्रमात बेंगळुरू- बेळगाव आणि कटरा-अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस या गाड्यांचाही शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. नागपूर(अजनी)-पुणे वंदे भारत नागपूर ते पुणे हे अंतर जवळपास बारा तासात कापणे शक्य होणार असून यामुळे यापूर्वी लागणारा प्रवासाचा अधिकचा वेळ वाचणार अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी नागपूर ते पुणे प्रवासादरम्यान वर्धा, बडनेरा, अकोला,शेगांव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड येथील स्थानकावर थांबून दौंड कॉर्डलाइन मार्गे पुण्याला पोहोचणार आहे. मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर आयोजित कार्यक्रम स्थळी वंदे भारतला पुष्पहार, तोरण, पताका व फुलांनी सजवण्यात आले होते. मुख्यमंत्री इतर उपस्थित अधिकार्यांदनी प्रवाशांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून संभाजीनगर ते पुणे हा नवीन एक्स्प्रेस-वे बांधण्यात येणार आहे. या नवीन महामार्गालगतच रेल्वे मार्ग बांधण्याची मागणी रल्े वमे त्र्ं याकड े के ली आह.े हा नवीन रल्े व े माग र् तयार झाल्यास नागपरू त े पण्ु याच े अतं र कमी हाणे ार आह.े याशिवाय कमी वळे ते पण्ु याला पाहे चता यणे ार असल्याची माहिती मख्ु यमत्रं ी दवे द्रें फडणवीस यानं ी दिली.
*भारत एक्सप्रेसची महत्वाची वैशिष्ट्ये
एकूण अंतर : 881 किलोमीटर – देशातील सर्वाधिक लांब वंदे भारत प्रवासाचा कालावधी: अवघ्या 12 तासांत नागपूर (अजनी) ते पुणे सेवा प्रारंभ : 11 ऑगस्ट पासून पुणे-अजनी, 12 ऑगस्ट पासून अजनी-पुणे स्टॉप्स : वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, म नमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन कोच रचना: एकूण 8 कोच – 1 एक्झिक्युटिव्ह चेअर कार, 7 चेअर कार; एकावेळी 590.
*सर्वाधिक अंतर पार करणारी गाडी
नागपूरसह संपूर्ण विदर्भातून पुण्याला जाणार्यांहची संख्या सातत्याने वाढत असल्याने नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसची मागणी केली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री अिेशनी वैष्णव यांच्या सकारात्मक प्रतिसादातून ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली आहे. ही गाडी देशातील सर्व वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमध्ये सर्वाधिक 881 किमीचे अंतर पार करणारी आहे.




