डिसेंबर-जानेवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

निवडणुकीत व्हीव्हीपॅट दिसणार नाही

* निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे संकेत

नाशिक /5 ऑगस्ट  : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 6 मे 2025 रोजी झालेल्या सुनावणीवेळी दिले होते. त्यामुळे निवडणुका ऑक्टोबरपर्यंत घेण्यात येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पण प्रभाग रचना व मतदार यादी यामुळे या निवडणुका सातत्याने लांबणीवर पडत आहेत. मात्र, आता खुद्द राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्याकोणत्या महिन्यात घेण्यात येतील आणि कोणत्या पद्धतीने घेण्यात येतील, याची माहिती दिली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका दिवाळीनंतर म्हणजेच डिसेंबर-जानेवारीमध्ये होणार आहेत असं राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.मुंबईतील रेस्टॉरंट्स राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नाशिक विभागातील आगामी निवडणुकांबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर आयुक्त वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूकपूर्व तयारीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका अशा सर्व निवडणुकांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम आखण्यात येणार आहे. नाशिक विभागात एकूण 50 लाख 45 हजार मतदार असून 4 हजार 982 मतदान केंद्रे आहेत. यासाठी 8 हजार 705 कंट्रोल युनिट्स लागणार असून 17 हजारांपेक्षा अधिक मतदान यंत्रांची आवश्यकता आहे. सर्व निवडणुका एकत्र घेतल्यास मनुष्यबळाची मोठी अडचण येणार आहे. त्यामुळे निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, प्रथम कोणत्या संस्थेची निवडणूक होणार, हे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही, असे दिनेश वाघमारे यांनी म्हटले आहे. तसेच, या निवडणुकांमधील आरक्षणाची सुद्धा आयुक्त वाघमारे यांनी माहिती दिली.

संबंधित बातम्या

Back to top button