शारीरिक अत्याचारातून अल्पवयीन मुलीला गर्भधारणा

पळवून नेत दीड वर्ष शोषण

-आरोपीवर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा
अमरावती / 28 जुलै : 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्यानंतर एका युवकाने तिच्यावर सतत दीड वर्ष शारीरिक अत्याचार केले. या लैंगिक शोषणातून तिला गर्भधारणा झाला आणि तिने मृत अर्भकाला जन्म दिला. याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी आरोपी युवकावर बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश मोतीराम सावरकर (25, रा. सावरपाणी, चिखलदरा) असे आरोपीचे नाव आहे. त्याने पिडितेला आपल्या प्रेमजाळ्यात ओढून 1 नोव्हेंबर 2023 रोजी अंजनगाव सुर्जी येथे पळवून नेले. तेव्हापासून त्याने युवतीशी शारीरिक संबंध स्थापित करुन तिचे सतत लैंगिक शोषण केले. त्यातून अल्पवयीन युवतीला गर्भधारणा झाली. 8 महिने पूर्ण झाल्याने प्रसूतीसाठी तिला अमरावती येथे जिल्हा स्त्री रुग्णालयात आणले होते. तिने मृत अर्भकाला जन्म दिला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अमरावती येथे गाडगेनगर पोलिसांनी पिडित युवतीचे बयाण नोंदविले आणि आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. घटनास्थळ अंजनगाव सुर्जी असल्याने हे प्रकरण तेथील पोलिसांना वर्ग करण्यात आले आहे. पुढील तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या

Back to top button