आधी पर्यायी व्यवस्था करा मग अतिक्रमन हटवा
फेरीवाल्यांसाठी युवा स्वाभीमानीचे आंदोलन

-महापालिका मुख्यालयात निदर्शने
अमरावती / 24 जुलै: कोणतीही पर्यायी व्यवस्था करुन न देता फेरीवाले व रस्त्यावर दुकान मांडणार्या लहान व्यावसायिकांचे अतिक्रमन हटविणे, हा त्यांच्यावर अन्याय असून महापालिकेच्या कारवाईमुळे या व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट आले आहे, असा आरोप करित युवा स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज महापालिकेत धडक दिली. स्वाभिमान युवक हॉकर्स युनियनचे अध्यक्ष गणश मारोडकर यांच्या नेतृत्वात यावेळी तीव्र निदर्शने करण्यात आली. आंदोलनात कार्यकर्त्यांसोबतच शहरातील छोटे व्यावसायिक आणि फेरीवाले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने यावेळी महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांना एक निवदेन सादर करुन या समस्येवर त्यांच्याशी चर्चा केली. अतिक्रमन हटविण्याआधी लहान व्यावसायिक आणि फेरीवाल्यांकरिता व्यवसायासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करावी, त्यानंतरच अतिक्रमन हटविण्यात यावे, कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्य व्यावसायिकांना परत करण्यात यावे, या साहित्याची निलामी करण्यात येउ नये, कारवाईदरम्यान आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम परत करण्यात यावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
या आंदोलनात युवा स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह फेरीवाल, हॉकर्स, रस्त्याच्या कडेला महापालिकेच्या जागेत दुकान थाटणारे व्यावसायिक आपल्या रोजीरोटीचा प्रश्न घेउन आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती. आंदोलनात प्रामुख्याने सारिका राउत, वंदना शिरभाते, उमा आमले, शीला माहोरे, शांता गवई, शिट्टू माहोरे, जावेद अब्दुल रफीक, दिगांबर कोरडे, गजानन शिरभाते, रामदास काटोलकर, संतोष भुयार, बबनराव गवई, संजय ठाकरे, गोपाल उकरडे, अब्दुल शहीद अब्दुल रहेमान, दादाराव गायकवाड, रवि मानकर, गुणवंत आगले, संतोष जांभुलकर, सुनील सोनवने, नारायण नगर, विलास गवई, सौरभ देशमुख, विजय नाफडे, सिध्दार्थ भारसाकले, प्रताप साहू, सुनील देशमुख, अंकुश तलकीत, प्रशांत किटुकले, हरिदास वानखडे, रामदास काटोलकर, आशीष ढोले यांनी सहभाग घेतला.




