बडनेरामध्ये भाजपची भव्य तिरंगा रॅली
विविध पक्षांचे शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग

अमरावती /21 मे: भारत-पाकिस्तानमधील युद्धसदृश परिस्थिती आणि ऑपरेशन सिंदूर यानंतर भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ आणि भारतीय जवानांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मंगळवारी 20 मे रोजी सायंकाळी बडनेरा शहरातील नई वस्ती येथे भाजप, शिवसेना, युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान भारत माता की जय आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.
बडनेरा शहरातील जयस्तंभ चौक नवी वस्ती येथून सायंकाळी 6.15 वाजता रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली जयस्तंभ चौकातून सुभाष चौक, अकोला रोडवरील मोदी हॉस्पिटल, संभाजी चौकमार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी चौकमार्गे परत जयस्तंभ चौकात आली. रॅलीत सहभागी शेकडो कार्यकर्त्यांच्या हातात तिरंगा झेंडे होते. तसेच जयस्तंभ चौकात 40 माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याबाबत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी माजी सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये अनिल खरुले, साळुंखे यांचा समावेश होता. तिरंगा रॅलीत भाजपचे प्रदेश चिटणीस जयंत डेहनकर, माजी नगरसेवक सुनील काळे, माजी नगरसेविका गंगाताई अंभोरे, राजू कुरील, सचिन रासने, शाम पाध्ये, विवेक चुटके, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष कौशिक अग्रवाल, राजू शर्मा, किशोर जाधव, डॉ.विरेंद्र ढोबळे, नरेश धामायी, राहुल जाधव, तुषार अंभोरे, किरण अंबाळकर, राजूभाऊ देवडा, पूजा जोशी, सतनाम कौर हुड्डा, रोशनी वाकडे, तृप्ती वाठ, टेकचंद केसवानी, गुरमित सिंग हुडा, सुनील लॉयबोरे, उमेश निलगिरे, पंकज कटारिया, सूरज जोशी, संजय कटारिया, संतोष कटारिया, विश्वजीत डुमरे, अन्नू शर्मा, प्रदीप सोळंके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.