सुपर स्पेशालिटीच्या कंत्राटी कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन
कंत्राटदाराच्या कारभाराविरोधात रोष

अमरावती / 11 जुलै: विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अर्थात अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील कंत्राटी कर्मचार्यांनी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात कामबंद आंदोलन केले. रुग्णालयात मनुष्यबळ पुरविणार्या सक्षम फॅसलिटी या दादर, मुंबई येथील कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराविरोधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रुग्णालयाच्या वैद्यकिय अधीक्षकांना निवेदन सादर केले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष गौरव ठाकरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. निवेदनातून वैद्यकिय अधीक्षकांकडे विविध मागण्या करण्यात आल्या. रुग्णालयातील कंत्राटी कर्मचार्यांना वेळेवर वेतन अदा करण्यात यावे, ठरलेल्या कामानुसार वेतन निश्चित करण्यात यावे, तीन वर्षांचा बोनस आणि आतापर्यंतच्या फरकाची रक्कम देण्यात यावी, पीएफ आणि एसआईसीचे चालान दर चार वर्षांनी नावासहित प्रस्तुत केले जावे, शासन निर्णयानुसार लागू असलेला दैनिक भत्ता कर्मचार्यांना देण्यात यावा, कंपनीचे काम बंद झाल्यानंतर नवीन कंत्राटदाराकडे जून्या कर्मचार्यांना नियमित पद्धतीने रुजू करुन घेण्याचा नियम करण्यात यावा, रोजंदारी तत्वावर कामासाठी लोकांना बोलाविण्याऐवजी जून्या कर्मचार्यांना प्राधान्य मिळावे तसेच सर्व कर्मचार्यांना वार्षिक बोनस वेळेत मिळावा या मागण्यांचा त्यात समावेश आहे.
या आंदोलनात दिपक शर्मा, वैभव काठोले, आंदन रेंद्रे, निशांत काने, अनिकेत मानकर, अमोल पोकले, शिल्पा मानकर, शितल पोकले, ज्योती राऊत, अनिकेत तायडे, पंकज गुडदे, आकाश निचत, लक्ष्मण देवगिरीकर, मुजमिल खान, रोहन साखरकर, सुजित भालेराव, योगेश महिंगे, दुर्वेश अस्वार, पवन भेंडे, विक्रांत येते, ओम देशमुख, चंद्रकांत पवार, रजनी हरडे, अभिमन्यु बारे, गोविंद कोंघे, रोशन वरगट, अक्षय मनोहरे, लक्ष्मण वालुकर, जिवन तेलमोरे, स्वप्नील सरोदे, चंद्रकांत देव, कार्तिक पन्नासे, अब्दुल अनिस करिम, गौरव गावंडे, शंकर घाटे, अतुल उईके, गणेश झगरे, सागर गणोरकर, दिलीप खंडारे, रोशनी मेटांगे, आकाश इंगले, लोचनसिंग गौबंसे, वर्षा वानखडे, संगीता शेकडे, दत्ता काठोले, सुनिल गजभिये, छाया मिश्रा, सोमेश्वर सावंत, शालीनी गांवडे, सुनिल भोसले, शैलेश वानखडे, संतोष इंगले, रवि गोरले, नेहा वासनिक, अतुल मोहोड, चैताली पोकले, रूपाली टिंगणे, जिवन जाधव, नरेश सोलंके, सुनिता चक्रे, विकास जामनिक, ज्ञानेश्वर लांजेवार, उमेश मेश्राम, पवन जेवडे, ज्ञानेश्वर राउत, सुमित सिरसाट, राणी इंगले, भारती वानखडे, आदित्य पवार, शुभम अरक, वेदांत इंदुरकर, ममता तायडे, निरज ठाकुर, संजु मोहोकर, मीना निशानदार, पूजा वानखडे, पुनम वर्मा, राहुल शेंडे, रिना पोकले, रोहित गिरी, रवि पंडीत, रोहण समुद्रे, सचिन शेरे, श्रीदेवी पोकले, पल्लवी मोहोड, रवी बचाले, भारती वासनिक, आकांक्षा खाडे, देवेंद्र दाविर, विद्या टिंगणे, वैभव तरेकर, अनिकेत मोहोड, अभिषेक बसविस्थले, रोहीत तातोड, बबलु गवई, सुमित वानखडे, रोहीत गुदडे, संदिप धुले, वनमाला सदांशिव, ममता सुपनेरे, सरिता तंतरपाले, जयकृष्ण चक्रे, प्रियंका बोदुले, प्रमोद वानखडे, भारत कांबले, पुजा काले, आकाश काळे, गिरिष मुंगले, विजयमाला पाटिल, अक्षय बुंदिले, लक्ष्मी सोनोने आदि सहभागी झाले होते.




