उपनयन आणि वधुवर परिचय मेळावा उत्साहात संपन्न
श्री शैव गुरव हितकारिणी मंडळाचे आयोजन

-40 बटूंवर मौंजीबंधन संस्कार
-मान्यवर नेत्यांनी दिल्या भेटी
अमरावती / 20 मे: श्री शैव गुरव हितकारिणी मंडळ, अमरावती यांच्या वतीने रविवारी मृगेंद्र मठ, अंबागेट येथे उपनयन संस्कार व वधुवर परिचय मेळावा उत्साहात आणि पारंपरिक धार्मिक वातावरणात संपन्न झाला. अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातून समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. सर्वपक्षीय नेत्यांनी भेट देऊन कार्यक्रमाची मुक्त कंठाने प्रशंसा केली. प्रमुख पाहुणे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी अकोली येथील गुरव समाज भवनाच्या वॉल कंपाउंडसाठी आपल्या खासदार निधीतून 50 लाख रुपये देण्याची घोषणा यावेळी केली.
या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सदस्य संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रताप अडसड, माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर रिना ताई, माजी नगरसेवक लकी नंदा, माजी नगरसेविका मंजूषा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रमाचे कौतुक करत गुरव समाजाच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. उपनयन विधीत जवळपास 40 बटुकांचा मंत्रोच्चारासह पारंपरिक पद्धतीने संस्कार करण्यात आला. तसेच वधुवर परिचय मेळाव्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 100 हून अधिक मुलांनी आणि सुमारे 80 मुलींनी नोंदणी केली होती. महिला आघाडीच्या अध्यक्षा मारोटकर ताईंनी कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष शरद देवरणकर, सचिव दिलीप बेलबागकर, प्रकल्प प्रमुख मनोज तायडे, त्रिदीप वानखडे, अशोक कुळकर्णी, राजेंद्र पंढरपूरकर, उपाध्यक्ष गोपाल चिखलकर व दिनकर अंबुलकर, कोषाध्यक्ष जयंत पुसतकर, श्रीकांत येते, मुकुंद पुसदकर, अनंत पुसदकर, विजय पुसतकर, जयंत वानखडे, डॉ. राजेंद्र बाळापुरे, दिपक पिंजरकर, शरद पुसतकर, गोपाळराव वाठोडकर, सुशील कथलकर, शंकरराव धानोरकर, राजेंद्र कुर्हेकर, श्रीकृष्ण बाळापूरे, निलेश वानखडे, हरिभाऊ बाळापुरे, प्रवीण शेगोकर, योगेश कथलकर, राजेश पुसतकर, अनिल चिखलकर, राहुल खंडारे, सागर दलाल, दिलीप पैठणकर, राजेश बोराटे, निलेश वानखडे, प्रकाश कोहळे, अभीजीत देवरणकर, पंकज खंडार, कृष्णराव चिखलकर, शुभम पाटील शेगोकर, श्रीकांत धानोरकर, संजय वानखडे, गोविंद रोहणकर, राजेंद्र कथलकर, सुधीर रोहणकर, युवक आघाडीचे महेश कथलकर, राहुल खंडारे, राहुल मोरे, महिला आघाडी अध्यक्षा तृप्ती व्यवहारे, सचिव संजीवनी मारोडकर, दिपा बेलबागकर, हितेषणी देवरणकर, संध्या पुसतकर, मेघा देवरणकर, सुनीता बाळापुरे, माधुरी तायडे, भारती तायडे, रीता पुसतकर, स्वाती न्याहाटकर, सारीका पुसदकर, चंदा तायडे, कुंदा पुसदकर, नलीनी चिखलकर, भारती तायडे, वर्षा कुर्हेकर, कुंदा पुसदकर, नलीनी चिखलकर, निलीमा अंजीकर, शुभांगी पुसदकर, रोशनी चिखलकर यांनी परिश्रम घेतले.