लाडक्या बहिणींना मे-जूनचा हप्ता एकत्र मिळणार?

खात्यात जमा होणार 3 हजार रुपये

पथ्रोट / 20 मे: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना मे महिन्याच्या रकमेची प्रतिक्षा आहे. अशातच मे महिन्याची रक्कम जूनच्या हप्त्यासोबतच एकत्रीत संबंधित महिलांच्या खत्यात जमा केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अद्याप त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मे महिना संपायला फक्त 10 दिवस उरले आहेत. त्याचसोबत एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला होता. त्यामुळे मे महिन्याचा हप्तादेखील लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
जर मे महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला तर महिलांना जून आणि मेचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही हप्ते 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सरकारकडून त्याबाबत जाहिर करण्यात आल्यानंतरच मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार की नाही हे स्पष्ट होईल. लाडकी बहीण योजनेत जर 2 महिन्याचे पैसे एकत्र दिले तर महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होतील. याचसोबत ज्या लाभार्थी महिलांना मागच्या महिन्याचे पैसे आले नाहीत त्यांनाही पैसे येऊ शकतात. त्यांना या महिन्यात दोन्ही महिन्याचे पैसे मिळतील.

संबंधित बातम्या

Back to top button