बच्चू कडू दुटप्पी, कर्जमाफीचा आमचा संकल्प

नागपूर : कर्जमाफीबाबत बच्चू कडूंची भूमिका दूटप्पीपणाची आहे, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात केली. ते म्हणाले, मी आणि आमचे इतर मंत्री साडेचार तास मंत्रालयात बसलो आणि एकेक प्रश्नावर मार्ग काढला. विधानसभा अधिवेशन काळात सरकार समिती जाहीर करणार आहे. महाराष्ट्राचा दौरा करून ही समिती कर्जमाफी ज्यांना पाहिजे त्यांचे कर्ज माफी करणार. मी बच्चू कडूंना लेखी दिला आहे की, आपल्याला कर्जमाफी करायची आहे, आमचाही अजेंडा आहे. आम्ही निवडणुकीच्या काळात संकल्प केला आहे. सरकारने कबूल केले आहे. असे बावनकुळे म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button