महानगर सेवा प्रमुख पदी उमेश वैद्य यांची निवड

अमरावती /20 मे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमरावतीच्या वतीने महानगर संघचालक उल्हास बपोरीकर यांनी साईनगर निवासी उमेश बळवंतराव वैद्य यांची महानगर सेवा प्रमुख पदी नियुक्ती केली आहे. अमरावतीच्या एकूण आठ विभागातील सेवा कार्यासाठी त्यांची नियुक्ती आहे. संस्कार वर्ग व सेवेसंबंधाची कामे यात येतात.
स्वतः उमेश वैद्य केल्या अनेक वर्ष डॉ. गोविंद कासट मित्र मंडळाच्या अंध अपंगांच्या कार्यात जुळून आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल डॉ. गोविंद कासट मित्र मंडळ तर्फे मातोश्री कमलताई गवई धीरूभाई सांगाणी सुदर्शन गांग प्राचार्य डॉ. सुभाष गवई धनंजय गूळदेकर राजेंद्र पचगाडे डॉ. गोविंद कासट यांनी अभिनंदन केले आहे.