अनोळखी इसामचा अपघातात मृत्यू

मोझरी बायपास रस्त्यावरील घटना

तिवसा / 5 जुलै: तिवसा पोलीस स्टेशनं हद्दीतील गुरुकुंज मोझरी-शेंदोळा या नवीन बायपास मार्गावर रात्री सुमारे बारा वाजता दरम्यान एक अनोळखी व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतक व्यक्तीचे वय अंदाजे 35 ते 40 वर्ष अअसल्याचे तिवसा पोलीसांनी सांगितले. मृतक व्यक्तीच्या अंगावर पिवळा – काळ्या चौखळा रंगाचा शर्ट, फिक्कट निळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट व उजव्या हातावर इंग्लिश मध्ये एसएन असे गोंदलेले असून अशा वर्णनाचा कोणी व्यक्ती बेपत्ता असेल त्याची माहिती पोलीस स्टेशनला तिवसाला कळवावी असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांनी केले आहे. यावेळी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीस तपासणीसाठी तिवसा उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. तर पुढील तपास पीएसआय पिसाळकर, पवन घरडे,भूषण चंदेल, सुनील गजबे,विशाल पेंढारकर हे करित आहे.

संबंधित बातम्या

Back to top button