पॅकेज खाद्यपदार्थांवर लागणार वॉर्निंग लेबल्स

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली/26 नोव्हेंबर-   न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, मीठ, एकूण साखर आणि संतृप्त चरबीच्या कमाल मर्यादा पुन्हा परिभाषित केल्या पाहिजेत.
चेतावणीची मर्यादा इतकी कमी नसावी की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या पॅकेजवर चेतावणी देणे आवश्यक ठरेल, किंवा इतकी जास्तही नसावी की हानिकारक प्रमाण देखील वगळले जाईल.
न्यायालयाने निर्देश दिले की पॅकेजच्या मुख्य भागावर तीन स्वतंत्र षटकोन तयार केले जावेत, ज्यावर प्रत्येकी उच्च चरबी, उच्च साखर, आणि उच्च मीठ असे लेबल लावलेले असावे. प्रत्येक षटकोनाने पॅकेजच्या मुख्य प्रदर्शन क्षेत्रापैकी किमान 4 ते 5 टक्के जागा व्यापली पाहिजे. मजकुराचा फॉन्ट मोठा आणि ग्राहकांना सहज वाचता येईल इतका स्पष्ट असावा.
पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांमधील पौष्टिक घटक आणि त्यांच्या आरोग्यावरील परिणामांबद्दल मुलांना आणि सर्वसामान्यांना शिक्षित करण्याच्या गरजेवरही खंडपीठाने भर दिला. सर्वोच्च न्यायालयाने ऋडडअख ला या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित नियमांचा मसुदा तयार करण्याचे आणि संबंधित घटकांकडून सूचना व आक्षेप मागवण्याचे निर्देश दिले. तसेच, हे नियम शक्य तितक्या लवकर अंतिम करून अधिसूचित करण्याचे निर्देशही दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 आठवड्यांनी होईल. त्या दिवशी, नियमांचा मसुदा अंतिम झाला आहे की नाही, याची न्यायालय चौकशी करेल. हे प्रकरण ‘फ्रंट ऑफ पॅकेट वॉर्निंग लेबल्स’ (ऋजझङ) च्या अंमलबजावणीशी संबंधित आहे. ‘3ड अँड अवर हेल्थ सोसायटी’ नावाच्या एका संस्थेने पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांमधील मीठ, साखर आणि चरबीच्या उच्च प्रमाणाबद्दल ग्राहकांना स्पष्ट चेतावणी देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. या प्रणालीच्या अंमलबजावणीतील हलगर्जीपणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी ऋडड-ख ला फटकारले होते.

Back to top button