टाकरखेडा संभु येथील पियुष मेश्राम यांना नागपूरमध्ये

मेकअप क्षेत्रातील मानाचा पुरस्कार

टाकरखेडा संभु/20 मे: टाकरखेडा शंभू येथील पियुष अरुण मेश्राम हे मागील पाच वर्षांपासून मेकअप इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असून, आपल्या कलात्मक कौशल्यामुळे त्यांनी अल्पावधीतच स्वतःची ओळख निर्माण केली आहे. व्यवसायासोबतच त्यांनी मेकअप क्षेत्रातील पुढील शिक्षण पूर्ण करत पदवी प्राप्त केली असून, त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीला एक नवी दिशा मिळाली आहे.

नागपूर येथील सुप्रसिद्ध आणि अनुभवी मेकअप आर्टिस्ट मंजिरी नेर यांच्या मार्गदर्शनाखाली पियुष मेश्राम यांनी उच्च दर्जाचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या प्रगतीचा गौरव म्हणून त्यांना विशेष प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
मेकअप क्षेत्रातील उत्तम अनुभव, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राहक समाधान हे पियुष मेश्राम यांच्या कार्याची वैशिष्ट्ये ठरत आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या पियुष यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर ही ओळख निर्माण केली असून, नवोदित तरुणांसाठी ते प्रेरणादायी ठरत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button