शिक्षकाकडून शिवीगाळ, विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल
गळफास घेउन केली आत्महत्या

-नांदुरा तालुक्यातील खळबळजनक घटना
बुलढाणा / 2 जुलै: पौगंडावस्थेतील युवक, विद्यार्थ्याचे मन अत्यंत संवेदनशील असते. काही विध्यार्थी तर अति संवेदनशील असतात. एखादी चुकीची बाब त्यांना असह्य ठरते. बुलढाणा जिल्ह्यातील एका दुर्दैवी आणि तितक्याच खळबळजनक घटनेत याचा प्रत्यय आला. शिक्षकाची अश्लील शिवीगाळ सहन न झाल्याने एका भावनाशील विध्यार्थ्याने टोकाचा निर्णय घेत गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे बुलढाणा जिल्हा आणि जिल्ह्याचे शैक्षणिक वर्तुळ अक्षरशः हादरले आहे.
नांदुरा तालुक्यातील वसाडी येथील 10 वी मध्ये शिकत असलेल्या मुलाने शिक्षकाच्या शाब्दिक व अनुषंगिक जाचाला कंटाळून आत्महत्या केली. परिवाराने स्वतःच्या शेतात बाधलेल्या नवीन घरातील लोखंडी एगंलला दोरीच्या साह्याने गळफास लावून घेत त्याने आपली जीवनयात्रा संपविली आहे. काल मंगळवारी, 1 जुलै रोजी रात्री उशिरा हा दुदैवी घटनाक्रम घडला. विनायक महादेव राऊत (15, रा. वसाडी, ता. नांदुरा, जि. बुलढाणा) असे आत्मघात करून घेणार्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मृतक विनायक याच्या खिशात सापडलेल्या ‘सुसाईड नोट’ मध्ये वर्ग शिक्षक सुर्यवंशी यांनी आईवडीलांबाबत उच्चारलेल्या अपशब्दाने अर्थात शिवीगाळीने अपमानित केल्याचे व त्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे नमुद आहे. या घटनेमुळे राऊत परिवार व गावाकर्यांना धक्का बसला आहे. या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याय तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपी शिक्षक सुर्यवंशी याला ताब्यात घेतले. ह्या शिक्षकाने दोन तिन वेळा शिक्षकांना न शोभणारी गैर वर्तणूक केली होती अशी चर्चा आहे. गावकर्यांनी याबाबत शिक्षण संस्था पदाधिकार्याकडे कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र शिक्षण संस्थेने काही दिवस वादग्रस्त शिक्षकाची बदली केली. मात्र पुन्हा वसाडी येथील शाळेवर रुजू करून घेतले. जर वेळीच ह्या शिक्षका वर योग्य कारवाई झाली असती तर आज रोजी वर्गात हुशार व चांगल्या विद्यार्थ्यांचा बळी गेला नसता, अशी संताप्त प्रतिक्रिया नातेवाईक व गावाकर्यात उमटली आहे.




