दोन कुटुंबात हाणामारी, तिघांचा मृत्यू

5 जण गंभीर, मुंबईतील घटना

मुंबई / 18 मे: मुंबईतील दहिसर पश्चिम एम.एच.बी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गणपत पाटील नगर परिसरात दोन कुटुंबात तुफान हाणामारीची घटना घडली. या दोन कुटुंबातील भांडणात चाकू आणि कोयताने एकमेकांवर जोरदार हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यामध्ये 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.
या भागात राहणारे शेख आणि गुप्ता कुटुंबांमध्ये 2022 पासून वाद सुरू होते. याच शत्रुत्वातून शनिवारी (17 मे) राम नवल गुप्ता यांच्या नारळ विक्री स्टॉलसमोर गुप्ता आणि शेख कुटुंबीयांमध्ये वाद झाला. दारूच्या नशेत आलेल्या अमित शेखने राम नवल गुप्ताशी वाद घातला आणि त्यानंतर दोघांनी आपापली मुले गोळा केली. यामुळे राम नवल गुप्ता, त्याची मुले अमर, अरविंद आणि अमित गुप्ता तसेच हमीद शेख आणि त्याची मुले अरमान आणि हसन यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला. जुन्या भांडणाचा राग मनात धरून या दोन्ही कुटुंबाने मोठा वाद झाला. यावेळी झालेल्या वादात गणपत पाटील नगर परिसरात असलेला दुकानदारांकडून चाकू आणि कोयता घेऊन दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला.
या हाणामारीत 49 वर्षीय हमीद शेख, 50 वर्षीय रमणलाल गुप्ता आणि 23 वर्षीय अरविंद गुप्ता या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एम.एच.बी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button