दहशत पसरविणार्‍या तरुणाला अटक

वॉलकट कंपाउंड परिसरात गुन्हे शाखेची कारवाई

अमरावती /22 ऑक्टोबर – शहरातील वॉलकट कंपाउंड परिसरात देशी दारूच्या दुकानाजवळ हातात कोयता घेऊन फिरत दहशत निर्माण करणार्‍या परवेज खान फिरोज खान (27, रा. पठाण चौक) या तरुणाला गुन्हे शाखा क्रमांक 1 च्या पथकाने पकडले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी त्याला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध शस्त्र कायद्यातील कलम 4 व 25 आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यातील कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा क्रमांक 1 चे पथक परिसरात गस्त घालत असताना वॉलकट कंपाउंड परिसरातील देशी दारूच्या दुकानाजवळ एक तरुण हातात कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. या तरुणाच्या हालचालींमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे पोलिसांना समजले. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित परिसरात सापळा रचून तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडील कोयता जप्त केल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या परवेज खान फिरोज खान याच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून गस्त घालून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

Back to top button