युवा स्वाभिमान पक्षात अजय गोंडाने यांचा जाहीर प्रवेश

आ. रवी राणा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

* रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याने आरोग्य सेवेला गती

अमरावती / 22 ऑक्टोबर – बडनेराचे आ. रवी राणा यांच्या नेतृत्वावर भरवसा ठेवून माजी नगरसेवक अजय गोंडाने यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह युवा स्वाभिमान पार्टीत जाहीर प्रवेश केला. आ. रवी राणा यांनी गोंडाने यांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा घालून आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी झटणार्‍या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. याच सोहळ्यात सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी बोलताना आ. रवी राणा म्हणाले की, अजय गोंडाने हे तळागाळातील सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणारे खंदे कार्यकर्ते आहेत. शेवटच्या घटकातील नागरिकांच्या अडचणी सोडवून त्यांना न्याय मिळवून देणे हेच पक्षाचे मुख्य ध्येय आहे. गोंडाने यांच्या येण्याने पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
आपल्या भावना व्यक्त करताना अजय गोंडाने म्हणाले की, गरिबांची जाण असणार्‍या आ. रवी राणांसोबत काम करण्याची संधी मिळणे भाग्याचे आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि जनसेवेचा वसा पुढे चालवण्यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे.
या सोहळ्यात युवा स्वाभिमान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठराव कात्रे, विधी सल्लागार नंदेश अंबाडकर, सुनील राणा, समाधान वानखडे, गणेशदास गायकवाड, जिल्हाध्यक्षा सोनाली नवले, ज्योती सैरीसे, शहराध्यक्ष राजा बांगडे, बाळू इंगोले, शिक्षण सभापती प्रीती रेवने, सुमती ढोके, महेश मुलचंदानी, रजनी डोंगरे, अर्चना तालन, अनुप अग्रवाल, सुरज चौधरी, बबलू गाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.याप्रसंगी घनश्याम डकरे, तुषार दुधे, सुरज मिश्रा, श्याम कथे, गौतम हिरे, नितीन तायडे, गजानन शिंदे, करण डेढवाल, आफाक सुबेदार, रॉय काका, गणेशदास तेलगोटे, प्रमोद गुडधे, रायबोले लाला, प्रमोद येवतीकर, विजया घोडेस्वार, सुचिता वनवे, सद्दाम हुसैन, प्रकाश करुले, युसुफ घोंडेवाले, करीमभाई, सुरेश पडोळे, प्रकाश कठाने, सागर लोखंडे, दिनेश टेकाम, लक्ष्मणराव लाठेकर, वंदना जामनेकर, सुरज चाफले, गुणवंत रंगारी, लता अंबुलकर, नीता खडसे, नंदा पाचळे, अजय घुले, बंडू डकरे, ऋषीकेश जाधव, पंकज चोपडे, नंदू चोपडे, संतोष खुरसुडे, शोभा किटके, मंदा तायडे, मीना आगासे, माला खुरसुडे, मीनाक्षी कुरवाडे यांच्यासह आदींनी पक्षात जाहीर प्रवेश केला.

गोरगरिबांच्या सेवेसाठी हक्काची नवी रुग्णवाहिका
पक्षप्रवेश सोहळ्यासोबतच जनतेच्या तातडीच्या आरोग्य सुविधेसाठी आ. रवी राणा यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. गरजू रुग्णांना आपत्कालीन स्थितीत वेळेत उपचार मिळावेत आणि त्यांना दवाखान्यात पोहोचणे सोपे व्हावे, यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली. राजकारणासोबतच समाजकारणाचा नवा आदर्श या उपक्रमातून समोर आला आहे.

Back to top button