’स्मृतीशेष दादासाहेब गवई जयंती सप्ताह’निमित्त वृक्षारोपण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात

अमरावती /22 ऑक्टोबर : श्री.दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावती द्वारा संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात स्मृतीशेष दादासाहेब गवई यांच्या जयंती सप्ताहाचे (22 ते 30 ऑक्टोबर 2026) आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने महाविद्यालयात विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम आणि स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत महाविद्या लयाच्या परिसरात मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा आदरणीय कीर्तीताई गवई (अर्जुन) यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच ट्रस्टचे सचिव डॉ.कमलाकर पायस आणि ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी डॉ. सचिन पंडित यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या स्वच्छता व वृक्षारोपण उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये पर्यावरण आणि स्वच्छतेविषयी जनजागृती झाली. या प्रसंगी प्रा.पी.आर. एस.राव, डॉ. श्याम तंत्रपाळे, डॉ. सुनील कुमार, डॉ. शुद्धोधन कांबळे, डॉ. प्रदीप अंबोरे, डॉ.प्रकाश म्हस्के, प्रा. डॉ.राजेश देशमुख, डॉ. प्रशांत खेडकर, प्रा. जी. एच. पांडे, डॉ. एस. बी. सांगोले, प्रा. प्रकाश बोरकर, प्रा.अनिल धोटे, प्रा. प्रवीण विधाते, प्रा. शंकर लाहोटी, प्रा. हर्षवर्धन देशमुख,सुभाष घुरडे व समस्त विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





