आयुती पेंढारीने नेत्रदिपक कामगिरी करीत प्राप्त केले कास्यपदक
आंतरविद्यापीठ महीला बुद्धिबळ स्पर्धेत

अमरावती /22 ऑक्टोबर : जे जे टी विद्यापीठ, झुंझुनू, राजस्थान येथे नुकत्याच आंतरविद्यापीठ महिला बुद्धिबळ स्पर्धा 2026-27 संपन्न झाल्यात या स्पर्धेत संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची चमु सहभागी झाली होती या सहभागी चमुतील कु. आयुती अनित पेंढारी या विध्यार्थिनीने स्पर्धक म्हणुन सहभागी होत आपल्या नेत्रदिपक खेळाने व उत्तम चढाई करीत अंतिम स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावीत कांस्य पदक व बोर्ड प्राईज प्राप्त केले. हा सन्मान प्राप्त करणारी ती श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पहिली विध्यार्थिनी ठरली आहे. कु. आयुती पेंढारी हिचे वडील अनित अनिल पेंढारी हे एच व्ही पी एम येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत असुन आई आशाली पेंढारी या सुद्धा शिकवणी वर्ग घेतात आजोबा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील सेवानिवृत्त अधिकारी अनिल उर्फ राजाभाऊ पेंढारी तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे सरचिटणीस अभिनंदन पेंढारी यांची नात आहे. लहान पणापासूनच तीला बुद्धिबळ खेळाची आवड आहे तिची आवड लक्षात घेत पालकांनी तिला योग्य प्रशिक्षका मार्फत शिक्षण दिले ती बडनेरा येथील प्रा राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयांची विधार्थिनी आहे. यावर्षी तिने दमदार कामगिरी करीत अमरावती विद्यापीठाचे नांव अभिमामाने उंचावले आहे यश मिळवण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता नव्हे, तर संयम, दूरदृष्टी पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल. तुझा हा विजय म्हणजे भविष्यातील अनेक यशस्वी वाटचालींची नांदी आहे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.





