धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 14 वर्षांपासून अखंड अन्नदानाची परंपरा
प्रज्ञा स्पर्श बहुउद्देशीय संस्थेचा अनुयायांसाठी स्तुत्य उपक्रम

हजारो अनुयायांना भोजनदान
नांदगाव पेठ/21 ऑक्टोबर : समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणार्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीकडे जाणार्या बौद्ध अनुयायांच्या सेवेसाठी प्रज्ञा स्पर्श बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नांदगाव पेठ टोल नाका येथे भोजनदान उपक्रम राबविण्यात आला. गेल्या 14 वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या उपक्रमातून दरवर्षी हजारो अनुयायांना भोजनदान करून सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाची परंपरा जपली जात आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या स्मरणार्थ दरवर्षी देशाच्या विविध भागांतून लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर अभिवादनासाठी येतात. या अनुयायांच्या प्रवासात भोजनाची सुविधा उपलब्ध व्हावी, त्यांना थोडा विसावा मिळावा आणि आपुलकीने त्यांची सेवा करता यावी, या उद्देशाने प्रज्ञा स्पर्श बहुउद्देशीय संस्थेने सुरू केलेला हा उपक्रम आज चौदाव्या वर्षातही उत्साहाने सुरू आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी देखील या अन्नदान कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी स्वतः अनुयायांना अन्नदान केले. लोकप्रतिनिधींनी केवळ उपस्थिती नोंदविण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष सेवाकार्यात सहभागी होणे, हा या उपक्रमातून दिला जाणारा महत्त्वाचा संदेश आहे. या उपक्रमाला राजेश बोडखे, विवेक गुल्हाने,मोरेश्वर इंगळे, विनोद डांगे, राजेंद्र तुळे , सागर खंडेलवाल, विजय भूतडा यांचे मोलाचे सहकार्य लाभले .स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे भोजनदानाची ही परंपरा सातत्याने पुढे जात आहे.भोजनाची व्यवस्था, नियोजन, वाढप आणि अनुयायांना आवश्यक सहकार्य अशा विविध जबाबदार्या पार पाडण्यासाठी अनेक कार्यकर्ते व स्वयंसेवक परिश्रम घेतात.
या धम्म उपक्रमासाठी पत्रकार मंगेश तायडे, कैलास मोरे, सुमेद कांबळे, धीरज गवई, मनीष गुळधे, अर्जुन युवनाते, दिनेश खडसे, सचिन कांबळे, मनोज गडलिंग, शंकर बसले, दिनेश कांबळे, दिनेश इंगोले, विजय खंडारे, अण्णाजी कांबळे, आदर्श डोंगरे, अनिरुद्ध कांबळे, निलेश कांबळे आणि अतुल गडलिंग, राजनंदिनी कांबळे, सुशीला कांबळे, शालू कांबळे, कोमल गडलिंग, सुजाता कांबळे, लता गडलिंग, येनू गडलिंग, निकिता गडलिंग, सपना गडलिंग, प्रणाली इंगोले, विशाखा कांबळे आणि रविना गडलिंग यांच्यासह अनेक युवक, युवतींचे सहकार्य लाभले.





