बायोटेक विभागाच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

अमरावती /21 ऑक्टोबर  : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बायोटेक विभागात जागतिक वन्यजीव सताहनिमित्त मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती, वाईडलाईफ अ‍ॅन्ड एन्व्हार्यमेंट कन्झर्वेशन सोसायटी, अमरावती आणि इंडियन वुमन सायंटिस्टस् असोसएशन यांच्या सहकार्याने सेमिनार, पोस्टर, निसर्ग व वन्यजीव छायाचित्रण, घोषवाक्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात विद्याथ्र्यांनी उल्लेखनीय यश संपादन करुन विभागाचे नाव उंचावले. पदवी स्तरावरील पोस्टर स्पर्धेत नंदिनी आगाशे प्रथम, जेनिफर कांबळे व्दितीय, तर श्रेया तिरपुडे तृतीय, घोषवाक्य स्पर्धेत साक्षी जाधव व्दितीय, सेमिनार स्पर्धेत आकांक्षा कराळे तृतीय, निसर्ग व वन्यजीव छायाचित्रण स्पर्धेत संचित पारधेकर प्रथम, पदव्युत्तर पोस्टर स्पर्धेत तनिषा तायडे व्दितीय, तर जावेरिया अनम तृतीय क्रमांक, घोषवाक्य स्पर्धेत निकिता काळमेघ हिने प्रथम क्रमांक पटकावला.विद्याथ्र्यांना विभागप्रमुख डॉ. अनिता पाटील, डॉ. प्रशांत ठाकरे, प्रा. सुदर्शन कोवे, प्रा. अनघा उंदीरवाडे, प्रा. मैथिली उगले यांचे मार्गदर्शन लाभले.

Back to top button