22 राज्यातील 3 हजार विद्यार्थ्यांच्या चित्तथरारक कवायती

सांस्कृतिक कला संस्कृतीचे सादरीकरण

 श्री हव्याप्र मंडळाचा 101 वा राष्ट्रीय विजयादशमी महोत्सव

अमरावती /21 ऑक्टोबर : जिल्ह्याचं कुलदैवत श्री अंबादेवी व श्री एकवीरादेवी नवरात्रोत्सवाला स्फुरण चढते ते श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या राष्ट्रीय विजयादशमी अर्थात दसरा महोत्सवाने. दशमीला देवींच्या सिमोल्लंघन नंतर स्थानिक अमरावती-बडनेरा मार्गावरील दसरा मैदानावर या 101 व्या ऐतिहासिक राष्ट्रीय विजयादशमी महोत्सवाचे आयोजन कर ण्यात आले होते. मंडळा मध्ये शिकत अस लेले सर्व विभागातील 22 राज्यातील तब्बल 3 हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भारतीय पारंपारीक खेळ, योग-व्यायाम आणि संस्कृती दर्शनातून चित्तथरारक कवायती सादर करीत विजयादशमी महोत्सवाला अखंड भारताचे स्वरूप दिले. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि.20 ऑक्टों. रोजी सायं.5 वाजता मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके व सचिव प्रा. विकास कोळेश्वर यांनी आद्य संस्थापक कै. अंबादासपंत वैद्य यांच्या प्रतिमेला अभि वादन केले व श्री हनुमान व्यायाम प्रसा रक मंडळाचा 101 वा राष्ट्रीय दसरा महोत्सवाला सुरूवात झाली. या महोत्सवाला मनपा महापौर श्रीचंद तेजवानी, लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थांच्या कुलपती डॉ. कल्पना शर्मा, प्रसून शर्मा, आ. प्रताप अडसड, मनापा अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, एक्साईज विभागाचे उपयुक्त पराग नवलकर मंडळाचे कार्याध्यक्ष एड. प्रशांत देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डॉ. माधुरीताई चेंडके, कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे, सचिव डॉ. विकास कोळेश्वर, सचिव प्रा. रविंद्र खांडेकर, मंडळाचे आंतरराष्ट्रीय समन्वयक प्रा. प्रणव चेंडके, प्रा. दीपाताई कान्हेगावकर, डॉ. संजय तिरथकर, संजय खराटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आ. रवी राणा यांनी देखील दसरा महोत्सवाला भेट देत आयोजक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मनपा महापौर श्रीचंद तेजवानी, लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थांच्या कुलपती डॉ. कल्पना शर्मा, प्रसून शर्मा, आ. प्रताप अडसड यांनी पथसंचलनाचे निरीक्षण करीत विद्यार्थ्यांच्या परेड ला सलामी दिली. राष्ट्रगीत, वंदे मातरम, हिंद के बहादुरो या गीतांनी दसरा महोत्सवाला सुरूवात झाली. यानंतर मंडळाच्या विद्यार्थ्यांनी डंबेल्स कवायत, मल्लखांब, रोप मल्लखांब, दंड बैठक, रायफल डील, गोला ड्रिल, विटा फेक भाला ड्रील, सिंगल दांड पट्टा, डबल दांडपट्टा, दांडपट्टा ड्रील, लेझीम, सिंगल लाठी, दो हाती तलवार, ढाल तलवार, एरोबिक्स, योगा ड्रील, जिम्नास्टिक्स, रशियन ड्रील, बॉक्सींग, तायकांडो, बॉडी बिल्डिंग, सिंगल बनेटी, दो हाती बनेटी, चेन बनेटी, जलती जोडी टॉर्चेस मार्चिंग, लेझीम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन वाद्यवृंद विभागाच्या तालबद्ध संगीतमय रीतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन, आभार डॉ. विजय पांडे, डॉ. अरुण खोडस्कर, प्रा. जयंत गोडसे, आनंद महाजन यांनी केले. समारोपीय सोहळ्याला मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डॉ. माधुरीताई चेंडके, कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा

स्थानिक दसरा मैदान येथे सायं.5 वाजता या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या राष्ट्रीय विजया दशमी सोहळा अमरावतीकरांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. ड्रोन द्वारे आकाशातून सतत होणारी पुष्पवृष्टी आणि त्याखाली भारतीय पारंपारीक खेळ, कवायतीचे सादरीकरण करतांना विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध रित्या सादरीकरण केले. प्रामुख्याने मल्लखांब व त्यावरील आगीचे डोम, रोप मल्लखांब, महाराष्ट्राच्या वेशभुषेत विद्यार्थीनींचा लेझीम, ढाल तलवार, जिम्नास्टीक च्या थक्क करणार्‍या कवायती, भाला फेक अशा एक ना अनेक चित्तथरारक कवायती सादरीकरणा दरम्यान हजारो उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले होता. आपल्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा हा राष्ट्रभक्तीचा सोहळा पाहतांना डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा असल्याचे मत नागरीकांनी व्यक्त केले.

प्रेरणादायी सोहळा

1914 मध्ये स्थापन झालेले श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने 1925 पासून विजयादशमी चा सोहळा अविरत ठेवला आहे. मागील 101 वर्षांपासून दसरा महोत्सवाच्या माध्यमातून समाजाला निरोगी आरोग्य आणि बलवान समाजाची प्रेरणा देत आहे. या महोत्सवामध्ये देशातील विविध राज्यातील विद्यार्थी तालबद्ध आणि एकरूप होवून विविध खेळ व कवायती सादर करतात. हे पाहतांना अखंड भारताचे होणार दर्शन गौरवास्पद आहे. खेळ आणि व्यायाम प्रत्येक युवकाने आत्मसात करणे नितांत गरजेचे असून याद्वारे निरोगी आरोग्यासह उज्वल भवितव्य साकार होण्यास मदत होते. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कार्य प्रेरणादायी आणि देशहिताचे असल्याचे मत आ. प्रताप अडसड यांनी व्यक्त केले.

Back to top button