लैंगिक शोषणातून अल्पवयीन मुलीला गर्भधारणा

अपहरण करुन केले अत्याचार?

अमरावती / 27 जून: एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे एका 28 वर्षीय नराधमाने अपहरण करुन सतत दहा महिने तिच्यावर अत्याचार करुन लैंगिक शोषण केले. त्यातून या मुलीला गर्भधारणा झाली. आरोपीच्या तावडीतून सुटून घरी परतल्यानंतर पिडितेच्या मातेने याबाबत तक्रार नोंदविल्यानंतर धारणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. सुखलाल कुंजीलाल जावरकर (28, रा. भांडूप, ता. चिखलदरा) असे आरोपीचे नाव आहे.
25 ऑगस्ट 2024 रोजी पिडिता घरी एकटीच होती. आई-वडिल बाहेर गेलेले असताना आरोपी सुखलाल जावरकर तिच्या घरी आला. संधी साधून त्याने 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेले. त्यानंतर सतत दहा महिने त्याने स्वत:च्या भांडूप येथील घरी आणि बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी जबरदस्तीने या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यातून या मुलीला गर्भधारणा झाली. त्यानंतर आरोपीच्या तावडीतून सुटून या मुलीने आपले घर गाठले आणि आपबीती आई-वडिलांना सांगितली. पिडितेच्या आईने याबाबत धारणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर पोस्को कायद्याअंतर्गत बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button