आधी महिला आरक्षण लागू होऊ द्यावे

स्मृती इराणी यांचे राहुल गांधी यांना आवाहन

मुंबई/23 ऑगस्ट : देशात आधी महिला आरक्षण लागू होऊ द्यावे. जर राहुल गांधी हे महिलांच्या बाजूने असतील, तर त्यांनी 33% आरक्षण लागू करण्यास आणि संपूर्ण वंदे मातरमच्या गायनाला पाठिंबा देऊन हे सिद्ध करावे, असे आवाहन भाजपच्या सरचिटणीस स्मृती इराणी यांनी रविवारी केले.
इराणी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, काँग्रेसच्या त्या प्रमुख नेत्याला माझी एक विनंती आहे. वंदे मातरमच्या ज्या कडव्यांचे गायन काँग्रेस मुख्यालयात थांबवले गेले होते, त्यामध्ये देवी दुर्गेचा उल्लेख आहे.
हिंदू धर्मातील आपली धार्मिक मूल्ये केवळ यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: या तत्त्वाचेच समर्थन करत नाहीत, तर आपण भगवती, लक्ष्मी आणि सरस्वती यांसारख्या देवींचीही पूजा करतो. आपण देवी दुर्गेची शक्तीचे प्रतीक म्हणून पूजा करतो. महिला आणित्यांच्या नेतृत्वाच्या समर्थनात काल केलेल्या विधानांची अंमलबजावणी ते प्रत्यक्ष कृतीतून करू शकतात. यासाठी त्यांनी महिला आरक्षणाच्या तात्काळ अंमलबजावणीला पाठिंबा द्यावा आणि काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरमच्या पूर्ण आवृत्तीचे गायन आयोजित करावे. संसदेत महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे विधेयक त्वरित लागू करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराला त्यांनी पाठिंबा द्यावा, अशा शब्दा्ंत त्याांनी निशाणा साधला.

संबंधित बातम्या

Back to top button