विकृताकडून दोन बालकांवर अनैसर्गिक अत्याचार
तिवसा तालुक्यातील घटना, नराधमाला अटक

अमरावती / 18 मे: एका मनोविकृताने दोन अल्पवयीन बालकांना एकट्यात गाठून त्यांच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचा केल्याची घटना तिवसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरुन तिवसा पोलिसांनी नराधमाविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. प्रतिक गणेश विघे (21, अनकवाडी, ता. तिवसा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार तिवसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्या गावातील रहिवासी असलेले दोन बालक गावाशेजारी असलेल्या मंदिराच्या मागे मोकळ्या जागेत खेळत होते. त्यावेळी प्रतिक गणेश विघे तेथे पोहोचला. त्याने दोन्ही बालकांना धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. त्याने या बालकांना मुख मैथून करण्यास भाग पाडल्याचे पिडितांनी सांगितले आहे. या प्रकारामुळे दोन्ही बालक हादरुन गेले. त्यांनी घरी जावनू याबाबत आपल्या कुटुंबियांना सांगितले.
त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील एका महिलेने तिवसा पोलिस ठाण्यात जावून प्रतिक विघेविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही बालकांची वैद्यकिय तपासणी केली. त्यानंतर नराधम प्रतिक विघेविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.