माजी आमदारासह 11 जणांना जन्मठेप
राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

नवी दिल्ली/19 ऑगस्ट : उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. तब्बल 6 वर्षांनंतर औरैय्याच्या बहुचर्चित दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागला असून, विशेष खासदार-आमदार न्यायालयाने समाजवादी पार्टीचे माजी आमदार कमलेश पाठक आणि त्यांचा भाऊ संतोष पाठक यांच्यासह एकूण 10 जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे.
औरैयामधील पंचमुखी हनुमान मंदिराजवळील एका जमिनीच्या तुकड्यावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर अत्यंत भीषण हत्याकांडात झाले होते.धक्कादायक बाब म्हणजे, माजी आमदार कमलेश पाठक आणि प्रसिद्ध वकील मंजुल चौबे हे एकेकाळी अत्यंत जिवलग मित्र मानले जात होते.राजकीय तसेच सामाजिक व्यासपीठांवर नेहमी खांद्याला खांदा लावून वावरणारे हे मित्र जमिनीच्यावादातून एकमेकांचे कट्टर वैरी बनले. हा वाद इतका विकोपाला गेला की 6 वर्षांपूर्वी वकील मंजुल चौबे आणि त्यांची चुलत बहीण सुधा चौबे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या रक्तरंजित घटनेनंतर पोलिसांनी सखोल तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. तब्बल 6 वर्षे चाललेल्या या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला, पुरावे आणि साक्षीदार तपासण्यात आ…एनटीएमध्ये संस्थात्मक सुधारणा करण्याचे निर्देश दिले.




