राज्यातील कापड उद्योगाला मिळणार जागतिक झळाळी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई /19 ऑगस्ट : महाराष्ट्राच्या मातीत पिकलेला कापूस आणि त्यापासून तयार उत्पादने आता थेट परदेशातील मॉलमध्ये झळकणार आहेत. कापूस उत्पादनापासून ते जागतिक फॅशन बाजारपेठेपर्यंतची साखळी अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, ‘फार्म टू फॉरेन’ संकल्पनेद्वारे महाराष्ट्र जागतिक निर्यातीचे केंद्र होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (19 ऑगस्ट) व्यक्त केला.
जिओ वर्ल्ड सेंटर येथे असोचेम आयोजित ‘फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव्ह 2026’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत 2047’ च्या स्वप्नाला बळ देण्यासाठी राज्य सरकार ‘फाइव एफ’ व्हिजनवर काम करत असल्याचे सांगितले. यामध्ये फार्म ते फायबर, फायबर ते फॅक्टरी, फॅक्टरी ते फॅशन आणि फॅशन ते फॉरेन असा प्रवास निश्चित करण्यात आला आहे. आपल्याशेतातील कापूस, रेशीम, जूट आणि फळांचे जागतिक ब्रँडिंग करणे, हे आमचे उद्दिष्ट असल्याचे शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्राची ‘टेक्सटाईल हब’ म्हणून ओळख तसेच मुंबईला आर्थिक राजधानीचा दर्जा मिळवून देण्यात कापड गिरण्यांचा मोठा वाटा होता. याच ऐतिहासिक वारशाला पुढे नेत, नागपूरचा ‘पीएम मित्रा पार्क’ आणि अमरावती ‘टेक्स्टाईल क्लस्टर’ राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

Back to top button