कार-दुचाकी अपघातात दुचाकीचालकाचा दुर्दैवी मृत्यू

बेनोडा ते मोर्शी मार्गावरील जामगाव फाटयावरील

वरुड/18 ऑगस्ट – दुचाकी आणि कारच्या धडकेत दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अमरावती-पांढुर्णा महामार्गावरील जामगांव फाटयानजीक आज पहाटेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी प्राप्त माहीतीनुसार, किया सोनेटचा चालक योजीत दिपक तिडके (21) रा.वरुड यांचे त्याचे ताब्यातील वाहन एम.एच.27 डीयू 9524 अतिवेगाने व हयगयीने चालवुन विरुध्द दिशेने येत असलेल्या एम.एच.27 डीसी 4140 या स्प्लेंडरला जोरदार धडक दिली. कार ही वरुडहून मोर्शीकडे जात होती तर मृतक दुचाकीचालक शुभम विष्णुपंत बैतुले (30) रा.शिरजगाव (क.) ता.चांदुर बाजार हा शिरजगांव वरुन नागपुरकडे जातहोता. पहाटे 5.50 वाजता हा अपघात घडला. हा अपघात एवढा जोरदार होता की, दुचाकीचालकाचा अख्खा पायच मांडीपासुन वेगळा झाला होता तर पायाचा काही भाग एका झाडावर जावुन लटकलेला होता.
रस्त्याने ये-जा करणार्‍यांना अपघात झाल्याचे कळताच त्यांनी अपघातग्रस्तांना मदत करुन बेनोडा (शहीद) पोलिसांना अपघाताची माहीती दिली. ठाणेदार विवेक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठुन पंचनामा करुन मृतदेह वरुडच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरीता रवाना केला.
या प्रकरणी एम.एच.27 डीयू 9524 चा चालक योजीत दिपक तिडके (21) रा.वरुड याचे विरुध्द बेनोडा (शहीद) पोलिसांनी कलम 281, 106 (1) बी.एन.एस.अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास ठाणेदार विवेक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली हे.कॉ.पवन भोकरे करीत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button